स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्तदान शिबिराला सुरुवात

104

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात सोमवारी (१५ ऑगस्ट २०२२) मेरेथॉन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून रक्तदान शिबीर सुरु झाले. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

मुंबई अल्ट्रा आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या सहकार्याने मेरेथॉन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराला ८०० जणांनी नोंदणी केली असून, लोकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने करण्यात आले आहे. हे रक्तदान रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

(हेही वाचा-  स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात असा होणार स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा!)

सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान तब्बल १२ तास हे रक्तदान शिबीर चालणार आहे, यामुळे रक्तदात्यांना देशाच्या ७५ व्या  अमृत महोत्सवानिमित्त केवळ १५ मिनिटे देऊन एक मोलाची मानव सेवा करता येणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणीसाठी ७०२१९९८७९५, ९३२४०५१८४८, ९८२००००४००, ९९२०१४२१९५ या मोबाईलवर संपर्क साधावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.