Independence Day 2023 : स्वातंत्र्य लढ्याबद्दल माहितीपर मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

87

भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल सामान्य नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय यांच्यावतीने डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

१४ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश (माझी माती माझा देश) आणि फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित स्वातंत्र्यसंग्रामातील महत्वपूर्ण घटना आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी यासंदर्भात हे प्रदर्शन असेल सदर प्रदर्शनामध्ये १८५७ ते १९४७ पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांविषयीची दुर्मिळ छायाचित्रे व माहिती प्रदर्शित केली आहेत. VR गॉगल्स सारख्या डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्मिळ दृश्ये ही प्रदर्शित केली जात आहे. जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक्, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(हेही वाचा Terrorist : जगाला धोक्याची घंटा; जगभरातील दहशतवादी संघटना आल्या एकत्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.