पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन!

133

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाणीपुरवठ्याच्या सर्वाधिक तक्रारी येऊ लागल्या आहेत. पाण्याची वेळ निश्चित नाही, अवेळी पाणी येणे, पाणी पुरवठा कमी अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

( हेही वाचा : मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यात बससेवा! पहा वेळापत्रक )

जलशुध्दीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर

महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर पहिलाच जनसंवाद झाला. या जनसंवादमध्ये बहुतांशी तक्रारी या पाणी पुरवठ्या संदर्भात दाखल करण्यात आल्या आहेत. शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या शहराच्या विविध भागात नागरिक पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रारी करत आहेत. तर आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला ज्यादा पाणीपुरवठा करण्यासाठी चिखली येथील 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. असे प्रशासनाने स्पष्ट केले.

स्वतंत्र हेल्पलाईन

महापालिका आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी घेणार आहे. त्या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. हे पाणी एप्रिलच्या मध्यापर्यंत शहरवासीयांना मिळणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे तसेच पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी महापालिका स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.