श्रीलंकेच्या नौदलाकडून २८ जानेवारीला सकाळी तमिळनाडू येथील डेल्फ्ट बेटाजवळ १३ भारतीय मासेमारांना कह्यात घेत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. (Firing on Fishermen) यात २ मासेमार गंभीररित्या, तर अन्य ३ किरकोळ घायाळ झाले. त्यांच्यावर श्रीलंकेतील (Sri Lanka) रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेवरून श्रीलंकेच्या कार्यवाहक राजदूताला येथील परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आणि तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
(हेही वाचा – Tiger Death : वाघांच्या मृत्यूवर आळा घालण्यासाठी वनमंत्र्यांचे कठोर निर्देश)
मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने हे कृत्य केले आहे. या घटनेत पाच मच्छीमार जखमी झाले आहेत. तर यापैकी दोन मच्छीमारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेला विरोध दर्शविण्यासाठी भारत सरकारने श्रीलंकेच्या कार्यवाहू उच्चायुक्तांना पाचारण केले आहे.
श्रीलंकन नौदलाचे (sri lanka navy) हे कृत्य अस्वीकारार्ह्य आहे. मासेमारी बोटीवरील १३ मच्छिमारांपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे आणि सध्या त्यांच्यावर जाफना शिक्षण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांवर गंभीर आरोप केले आहेत. या मच्छीमारांनी संघटीतरित्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आणि एका अधिकाऱ्याची बंदूक खेचल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यामुळे नौदलाला गोळीबार करावा लागल्याचे श्रीलंकेच्या (Sri Lanka) नौदलाने म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community