Indian Economy : ‘लवकरच ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ सादर होणार, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मांडली जाणार

विकसित देश होण्यासाठी सरकार उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष देणार आहे.

152
Indian Economy : 'लवकरच 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर होणार, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मांडली जाणार
Indian Economy : 'लवकरच 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर होणार, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मांडली जाणार

भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर असणार आहे. अलीकडेच आपण चार ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला आहे.एकंदरीतच सध्या भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात म्हणजे २०४७ साली आपला भारत विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणू पुढे येईल. त्यावेळी विकसित देशाचा दर्जा मिळविण्यासाठी लवकरच ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ सादर केली जाणार आहे. त्यात भारत कोणत्या मार्गांवर हे लक्ष्य साध्य करेल याचा उल्लेख आहे. (Indian Economy)

भारताचा विकास योग्य दिशेने सुरू
NITI आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा विकास योग्य दिशेने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी २०२४  मध्ये Vision India@2047 डॉक्युमेंट आणणार आहेत. स्वातंत्र्याच्या १००  व्या वर्षात भारत कोणत्या मार्गांवर, सुधारणा आणि धोरणांच्या आधारे विकसित देश बनणार आहे, याचा त्यात उल्लेख असेल असे सुब्रमण्यम म्हणाले.(Indian Economy)

सरकार उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष देणार
विकसित देश होण्यासाठी सरकार उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष देणार आहे. महाविद्यालयांमधील प्रवेश सध्याच्या २७  टक्क्यांवरून ६०  टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. कॉलेजला जाणाऱ्यांची संख्या अंदाजे ९ कोटींवर नेली जाईल. तसेच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सरकार अधिकाधिक गुंतवणूक करणार आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. अनेक नवीन विद्यापीठेही सुरू होतील. याशिवाय देशात शैक्षणिक शहरेही तयार केली जातील, जिथे संशोधन आणि नवनिर्मितीवर भर दिला जाईल. खासगी क्षेत्रालाही शिक्षण क्षेत्रात अधिक भक्कमपणे काम करण्याची संधी दिली जाईल. (Indian Economy)

(हेही वाचा :Winter Session 2023 : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; लक्षवेधी स्वीकारण्यास सुरुवात

देश लवकरच 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था
भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. यासह भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. देश लवकरच 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य करेल अशी अपेक्षा आहे. सध्या, अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, ज्याची किंमत सध्या 26.7 ट्रिलियन डॉलर आहे. शेजारी देश चीनची अर्थव्यवस्था 19.24 ट्रिलियन डॉलर्स आहे. 4.39 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह जपान तिसऱ्या स्थानावर आहे आणि जर्मनी 4.28 ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह चौथ्या स्थानावर आहे. मात्र, भारताचा विकास सर्वात वेगवान आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.