India Export : जुलै महिन्यात भारताची निर्यात वाढली; दूध, मांस यांच्या निर्यातीत वाढ

India Export : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यातील निर्यात २.८१ टक्क्यांनी वाढली आहे. 

76
India Export : जुलै महिन्यात भारताची निर्यात वाढली; दूध, मांस यांच्या निर्यातीत वाढ
  • ऋजुता लुकतुके

जुलै महिन्यातील भारतीय निर्यातीत २.८१ टक्क्यांनी वाढ झाल्याचं भारताच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात ६०.७१ अब्ज होती. ती आता ६२.४२ अब्ज झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात भारताची एकूण निर्यात जवळपास २६० अब्ज डॉलर इतकी झाली होती. यावर्षीचे निर्यात लक्ष ८०० अब्ज पर्यंत गाठण्याचा आशावाद सरकारने व्यक्त केला. एप्रिल ते जुलै दरम्यान व्यापारी वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य १४४.१२ अब्ज डॉलर्स होते. मागील वर्षीच्या तुलनेत यात ४.१५ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. (India Export)

(हेही वाचा – ‘Badlapur घटनेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची काय गरज?’; Sanjay Raut यांचा सवाल)

जागतिक व्यापार संघटनेच्या ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्सने एप्रिलमध्ये म्हटले आहे की, २०२४ आणि २०१५ मध्ये जागतिक व्यापारात हळूहळू वाढ होईल. २०२३ मध्ये ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमती आणि प्रगत अर्थव्यवस्थांमधील चलनवाढ यांच्या दीर्घकाळ परिणामांमुळे मागील चार महिन्यात निर्यात आकुंचन पावली होती. त्यात आता वाढ होत असल्याने दिलासा मिळाल्याचे चित्र आहे..कोणत्या क्षेत्रांमध्ये झालीये वाढ? (India Export)

(हेही वाचा – China ची सीमेवर पुन्हा कुरघोडी; लडाखच्या सीमेवर हेलीस्ट्रीप)

देशातील नोन पेट्रोलियम उत्पादनांमध्ये आणि दागिन्यांच्या निर्यातीत मागील वर्षापेक्षा वाढ झाली असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांना सांगितलं. मागील वर्षी ही निर्यात २५.४७ अब्ज होती. ती आता २६.९२ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांनंतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यात वाढली आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात ही २०२३ मधील निर्यातीपेक्षा तब्बल ३७.३१ टक्क्यांनी वाढली आहे. अभियांत्रिकी वस्तूंची निर्यातही ३.६६ टक्क्यांनी वाढवून ९.४ बिलियन डॉलर इतकी झाली आहे. देशातील मांस, दुग्ध आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीमध्ये ही थोडीशी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ किरकोळ असली तरी ०.२९ बिलियन डॉलर वरून ०.४६ बिलियन डॉलर इतकी झाली आहे. देशाने २०३० पर्यंत दोन लाख कोटी डॉलरवरून निर्यात नेण्याचे लक्ष निश्चित केलं होते. (India Export)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.