जागतिक भूक निर्देशांक २०२३ मध्ये भारताची स्थिती बिकट झाली आहे. (Global Hunger Index) ताज्या आकडेवारीनुसार, १२५ देशांमध्ये भारत १११ व्या क्रमांकावर आहे. तसेच देशातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक १८.७ टक्के असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या प्रकाशकांनी भारतातील ‘भुकेची’ परिस्थिती गंभीर असल्याचे वर्णन केले आहे. तथापि, भारताने जागतिक भूक निर्देशांक २०२३ नाकारला आहे. या अहवालाबाबत भारताने म्हटले आहे की, हा देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी २०२२ मध्ये भारत १२१ देशांमध्ये १०७ व्या क्रमांकावर होता. (Global Hunger Index)
(हेही वाचा – RBI Action on Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; ठोठावला ‘इतक्या’ कोटींचा दंड, पण का?)
शेजारी देश आपल्या पुढे ?
शेजारील देश पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळची परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पाकिस्तान १०२ व्या, बांगलादेश ८१ व्या, नेपाळ ६९ व्या आणि श्रीलंका ६० व्या क्रमांकावर आहे. जागतिक भुकेच्या बाबतीत या देशांनी भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे, असे हा अहवाल सांगतो.
कुपोषणाचे प्रमाण १६.६ टक्के
या अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील अशक्त मुलांचे प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे १८.७ टक्के आहे. हे तीव्र कुपोषण दर्शवते. त्याच वेळी भारतात कुपोषण दर १६.६ टक्के आहे आणि ५ वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर ३.१ टक्के आहे. अहवालात असेही म्हटले आहे की,१५ ते २४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण ५८.१ टक्के आहे. (Global Hunger Index)
सरकारने आकडेवारी नाकारली
त्याचवेळी महिला आणि बालविकास मंत्रालयाने हा निर्देशांक नाकारला आहे. सरकारने याला उपासमारीची प्रमाणे वापरल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ग्लोबल हंगर इंडेक्स भारतातील वास्तविक परिस्थिती प्रतिबिंबित करत नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. या निर्देशांकाची गणना करण्यासाठी वापरले जाणारे चारपैकी तीन निर्देशांक मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामुळे म्हणून ते पूर्ण लोकसंख्येचे आरोग्य प्रतिबिंबित करू शकत नाहीत. (Global Hunger Index)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community