देशात सुरु होणार पहिला विद्युत महामार्ग! धावणार फक्त इलेक्ट्रिक गाड्या

प्रदूषणमुक्त प्रवासासाठी सरकारने नव्या उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुद्धा इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे. देशात असा महामार्ग बनवण्यात येईल की, यावर फक्त इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी असणार आहे.

( हेही वाचा : आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी UIDAI चे नवे नियम! प्रक्रिया झाली एकदम सोपी)

विद्युत महामार्गावर सर्व इलेक्ट्रिक वाहने धावणार आहेत. या महामार्गाच्या वरच्या बाजूला तारा असतील. या महामार्गावर धावणाऱ्या गाड्यांना या तारांमधून वीज मिळणार असून ही वीज वाहनांसाठी इंधन म्हणून काम करेल. तसेच या इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी महामार्गावर चार्जिंग पॉईंट सुद्धा बसवण्यात येणार आहेत.

कुठे होणार इलेक्ट्रिक महामार्ग?

सरकार दिल्ली ते जयपूर या मार्गावर विद्युत ( इलेक्ट्रिक ) महामार्ग बनवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील दौसा येथे ही घोषणा केली आहे. हा महामार्ग पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. हा देशातील पहिला ई-हायवे असणार आहे. स्वीडन आणि जर्मनीमध्ये इलेक्ट्रिक महामार्ग बनवण्यात आले आहेत. स्वीडनने २०१६ मध्ये ई-हायवेची चाचणी सुरू केली आणि २०१८ मध्ये जगात पहिला ई-हायवे सुरू झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here