India Forex Reserves : भारताचा परकीय चलन साठा थेट ६४५.६ अब्ज अमेरिकन डॉलरवर

India Forex Reserves : मार्च २०२४ मध्ये देशाच्या परकीय गंगाजळीत विक्रमी वाढ होऊन तो आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला आहे. 

158
India Forex Reserves : भारताचा परकीय चलन साठा थेट ६४५.६ अब्ज अमेरिकन डॉलरवर
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. मार्च २०२४ या महिन्यात परकीय चलनासाठ्यानं नवीन विक्रम केला आहे. परकीय चलनसाठा ६४५ अब्ज डॉलर इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शक्तिकांत दास यांनी नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या आर्थिक धोरणाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. (India Forex Reserves)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात सुमारे ३ अब्ज डॉलरची वाढ झालीय. त्यामुळं भारत बाह्य गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण सक्षम असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिली. दरम्यान, या महिन्यात परकीय चलनसाठ्यानं आत्तापर्यंतचा विक्रम केला आहे. ६४५ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. दरम्यान, २०२३ मध्ये देखील परकीय चलनसाठा हा ६४२ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. (India Forex Reserves)

(हेही वाचा – Dilip Vengsarkar : भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकून देणारे भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर)

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान, परकीय चलनसाठ्यात मोठी घट झाली होती. मात्र, या युद्धानंतरच्या काळात परकीय चलनसाठ्यात चांगली वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या काळात देशाचा परकीय चलनसाठा हा ५२४ अब्ज डॉलरवर आला होता. त्यामुळं चिंता व्यक केली जात होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परकीय चलनसाठ्यात चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. (India Forex Reserves)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.