आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आगामी काळात भारत हे जगाचे विकास इंजिन असेल यात शंका नाही. याचे कारण असे की भारताने आपत्ती आणि अडचणीच्या काळात आर्थिक सुधारणेच्या संधींमध्ये रूपांतरित केले आहे. लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. १०० पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारतामध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स काऊन्सिलमध्ये (BRICS Business Forum Leaders Council) पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, ब्रिक्स बिझनेस काऊन्सिलने दहा वर्षांत आमचे आर्थिक सहकार्य वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जेव्हा २००९ मध्ये ब्रिक्सची पहिली परिषद झाली, तेव्हा जग मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर येत होते. या काळात ब्रिक्स हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आशेचा नवा किरण म्हणून उदयास आला होता. कोविड महामारी, तणाव आणि युद्ध यामुळे जग आर्थिक आव्हानांमधून जात आहे. अशा वेळी ब्रिक्स देशांची महत्त्वाची भूमिका आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील करोडो लोकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) केले जाते. आतापर्यंत अशा प्रकारे ३६० अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढली आणि भ्रष्टाचार कमी झाला.
(हेही वाचा :Chandrayaan-3 लँडिंगच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन)
भारत हा जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश
आज भारतात UPI चा वापर रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत केला जातो. भारत हा जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे. UAE, फ्रान्स आणि सिंगापूर सारखे देश या प्लॅटफॉर्मशी जोडले आहेत. ब्रिक्स देशांसोबतही यावर काम करण्याच्या अनेक शक्यता आहेत. भारतातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्यामुळे देशाची परिस्थिती बदलत आहे. आम्ही या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १२० अब्ज डॉलरची तरतूद ठेवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community