अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) व्हाईट हाऊसमध्ये १९ जणांना प्रतिष्ठित ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ (Presidential Medal of Freedom) देऊन सन्मानित करतील. हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. यात कट्टर भारतद्वेष्टे अब्जाधीश जॉर्ज सोरोस (George Soros) यांचाही समावेश आहे.
(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy : विराट – रोहितची निवृत्ती, संघातील वातावरण आणि मालिकेतील पराभव यांवर गौतम गंभीर काय म्हणाला?)
व्हाईट हाऊस (White House) यांनी सोरोस यांना पुरस्कार देण्यासंदर्भात स्पष्ट केले की, जॉर्ज सोरोस यांनी लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांना बळकट करणार्या जगभरातील संस्थांना पाठिंबा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
त्यांच्याखेरीज अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि वर्ष २०१६ मध्ये डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या हिलरी क्लिंटन, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आदी नावांचाही समावेश आहे.
कोण आहेत जॉर्ज सोरोस ?
सोरोस हे अमेरिकी अब्जाधीश आणि साम्यवादी विचारवंत आहेत. भारत सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांसमवेत कट रचल्याचा त्यांच्यावर अनेक वेळा आरोप झाला आहे. ९४ वर्षीय सोरोस यांच्यावर जगातील अनेक देशांच्या राजकारण आणि समाजावर प्रभाव टाकण्यासाठी धोरण चालवल्याचा आरोप आहे. ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ (Open Society Foundation) या संस्थेने वर्ष १९९९ मध्ये प्रथमच भारतात प्रवेश केला. सोरोस यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये ‘म्युनिक सुरक्षा परिषदे’ला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, भारत हा लोकशाही देश आहे; पण पंतप्रधान मोदी लोकशाहीवादी नाहीत. सोरोस (George Soros) यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि कलम ३७० हटवण्यावरही पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community