झारखंडच्या (Jharkhand) दुमका येथे 1 मार्च रोजी एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर जगभरातून काही लोक भारताच्या विरोधात बोलत होते. परंतु, बलात्कार पीडिता आणि तिच्या पतीने भारताची बाजू घेत त्याला महान देश म्हटले आहे. तसेच भारतावर टीका बंद करावी, असे आवाहन देखील तिने केले आहे. (Spanish Woman Gang Rape)
(हेही वाचा – Veer Savarkar : पोर्ट ब्लेअर विमानतळावर टाळला जातो वीर सावरकरांचा उल्लेख; सुनील देवधर यांनी केली ‘ही’ मागणी)
झारखंड पोलिसांनी दिली 10 लाख रुपयांची भरपाई
स्पेनहून टुरिस्ट (Spanish tourist) व्हिसावर एक जोडपे बांगलादेशमार्गे भारतात दाखल झाले होते. या दाम्पत्यात 28 वर्षीय महिला आणि तिचा 64 वर्षीय पती दोन बाइकवरून दुमका येथे पोहोचले होते. या ठिकाणी 7 जणांनी स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी झटपट कारवाई करत 3 गुन्हेगारांना जेरबंद केले. तसेच उर्वरित 4 आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी पीडितेला तत्काळ रुग्णालयात दाखल करून तिच्यावर औषधोपचार केले. झारखंड पोलिसांनी त्यांना 10 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. परंतु, या घटनेनंतर जगभरातून भारतावर टीका होऊ लागली. भारत हा असुरक्षित देश असल्याचे म्हटले जाऊ लागले होते. या प्रकारानंतर बलात्कार पीडित स्पॅनिश महिला आणि तिच्या पतीने भारताची बाजू घेतली आहे.
हे जगभर घडले आहे
जगभरातील टीकाकारांना उत्तर देताना पीडित महिलेने सोशल मीडियावर लिहिले की, “स्पेन असो, ब्राझील, अमेरिका किंवा इतर कोणताही देश, जगातील प्रत्येक देशात अशा घटना घडतात. आम्ही भारतात होतो म्हणून असे झाले म्हणणे बंद करा. मुद्दा असा आहे की बलात्कार किंवा दरोडा. तुमच्यावर, तुमच्या भावावर, तुमच्या आईवर, तुमच्या मुलीवर किंवा कोणावरही होऊ शकतो. जगातील कोणताही देशात अशा घटना घडत नाहीत असे नाही. स्पेनमध्येही असे अनेकदा घडले आहे. हे जगभर घडले आहे. स्पेन, ब्राझील, अमेरिका, सर्व देशांमध्ये घडले आहे…म्हणून आपण भारतात (India) आहोत म्हणून हे घडले असे बोलू नका.
प्रशासनाचे मानले आभार
याशिवाय या जोडप्याने सोशल मीडियावर एका आरोपीचे छायाचित्र पोस्ट केले आणि त्याला शोधण्यात त्यांना आणि पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी लिहिले की, भारत एक ‘महान आणि भेट देण्यालायक देश’ आहे. प्रशासनाच्या सर्व सहकार्याबद्दल त्यांचे आभार.” दरम्यान आज, मंगळवारी हे जोडपे पोलिस बंदोबस्तात पुढील प्रवासासाठी रवाना झाले. (Spanish Woman Gang Rape)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community