National Safe Motherhood Day: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व व इतिहास

345

बाळंपणात होणारे मातामृत्यू रोखण्यात भारताला बऱ्यापैकी यश आले आहे. प्रसूतीच्या काळात स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा दिली जावी जेणेकरून महिलेच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये या उद्देशाने दरवर्षी ११ एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिवस’ म्हणून सादरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाचा मुख्य उद्देश उत्तम वैद्यकीय सेवा प्रदान करणे हा आहे. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन २००३ पासून दरवर्षी साजरा केला जातो.

( हेही वाचा : राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २८ जिल्ह्यांना एकूण १७७ कोटींची मदत जाहीर)

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)दिलेल्या माहितीनुसार…

  • जगभरात प्रत्येक दिवशी ८३० हून अधिक महिलांचा प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती संबंधित कारणांमुळे मृत्यू होतो.
  • एकूण मृत्यूंपैकी ९९% मृत्यू हे विकसनशील देशांमध्ये नोंदवले गेले आहेत.
  • साल २००० ते २०२० या वीस वर्षांच्या काळात नवजात बालकाला जन्म देणाऱ्या माता मृत्यूच्या प्रमाणात ३४ टक्क्यांनी घट झाली आहे.
  • बालकाच्या जन्मापूर्वी, जन्मादरम्यान आणि जन्मानंतर जर योग्य काळजी घेण्यात आली असती, तर हे मृत्यू रोखता आले असते.

‘राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिवस’ इतिहास ..

  • व्हाइट रिबन एलायंस इंडिया यांचे एक सकारात्मक पाऊल म्हणजे हा विशेष दिवस.
  • साल २००३ मध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली
  • प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती संबंधित कारणांमुळे जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी १५% मातांचा मृत्यू भारतात होतो. गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या समस्या, त्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी या विषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

सरकारचे उपक्रम

  • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (जेएसएसके) ची २०११ मध्ये घोषणा करण्यात आली.
  • या अंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेची सरकारी रुग्णालयात मोफत प्रसूती होऊ शकते. यात सिझेरियन प्रसूतीचाही समावेश होतो.
  • प्रसूतीच्या दरम्यान आवश्यक असणारी औषधे, निदान, चाचण्या, सेवा नि:शुल्क मिळतात.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेद्वारे गर्भवती आणि स्तनापान करण्याऱ्या महिलेला तीन भागांमध्ये प्रत्येकी ५,००० रूपयांचे अनुदान दिले जाते.

सुरक्षित मातृत्वासाठी गर्भावस्थेत हे करा ..

  • योग्य संतुलित आहार, आराम आणि नियमित व्यायाम करावा
  • रक्त तपासणी
  • पोटाची तपासणी
  • वजन
  • रक्त दाबाची तपासणी
  • एचआईव्ही तपासणी

आहारात याचा समावेश करा…

  • आयरन कैल्शियमच्या गोळ्या
  • दुग्धजन्य पदार्थ
  • रताळे
  • हिरव्या भाज्या
  • अंडी
  • सोयाबीन

(आरोग्यासंबंधित निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्यावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.