कोरोना लसबाबत भारत आत्मनिर्भर 

अखेर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी फायझर कंपनीच्या लसीला जागतिक परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच जगभरात ही लस पोहचवली जाईल, भारत मात्र याबाबत आत्मनिर्भर बनण्याच्या विचारात आहे. त्यासाठी केंद्र सरकार सीरम आणि बायोटेकच्या या कंपन्यांच्या लसीला परवानगी देण्याची शक्यता आहे. 

अखेर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी फायझर कंपनीच्या लसीला जागतिक परवानगी दिली. त्यामुळे लवकरच जगभरात ही लस पोहचवली जाईल, भारत मात्र याबाबत आत्मनिर्भर बनण्याच्या विचारात आहे. त्यासाठी केंद्र सरकार सीरम आणि बायोटेकच्या या कंपन्यांच्या लसीला परवानगी देण्याची शक्यता आहे.

जगभरात फायझर लसीची चर्चा सुरु झाली असताना भारत मात्र या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ बनण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मोदी सरकार सीरमच्या ‘कोव्हीशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसींना मंजुरी देण्याची शक्यता आहे. तर फायझरकडूनही आपातकालीन वापरासाठी लशीला परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.

(हेही वाचा : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला महाबळेश्वरमध्ये अपघात)

देशव्यापी ड्राय रनसाठी महाराष्ट्राची निवड

केंद्र सरकारने 2 जानेवारीला सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्याची घोषणाही केली. त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

फायझरला जागतिक परवानगी 

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने हा मोठा निर्णय घेतला. त्यानुसार WHOकडून आपातकालीन वापरासाठी फायझर – बायोएटनेक (Pfizer-BioNTech) यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या लसीला मंजुरी देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या या लसीला हिरवा कंदील दाखवल्याने आता अनेक देशांमध्ये या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी या लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here