ऑगस्ट 2024 पासून बंद असलेली India-Israel flight सेवा 2 मार्चपासून पूर्ववत होणार

53
ऑगस्ट 2024 पासून बंद असलेली India-Israel flight सेवा 2 मार्चपासून पूर्ववत होणार
ऑगस्ट 2024 पासून बंद असलेली India-Israel flight सेवा 2 मार्चपासून पूर्ववत होणार

इस्त्रायल-इराण (Israel-Iran) यांच्यातील संघर्षामुळे ऑगस्ट 2024 पासून भारत-इस्त्रायल विमानसेवा (India-Israel flight) बंद करण्यात आली होती. आता परिस्थिती निवळल्यामुळे या विमानसेवेला पुन्हा सुरुवात करणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. त्यानुसार आगामी 2 मार्चपासून तेल अवीवसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. (India-Israel flight)

हेही वाचा-अंतराळात अडकलेल्या Sunita Williams यांना मस्क परत आणणार; Donald Trump यांनी दिली जबाबदारी

यासंदर्भात एअर इंडियाने (Air India) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून तेल अवीव, इस्रायलला आठवड्यातून 5 उड्डाणे चालवतील. एअरलाइन या मार्गावर त्यांचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान तैनात करेल, ज्यामध्ये बिझनेस क्लासमध्ये 18 फ्लॅट बेड आणि इकॉनॉमी क्लासमध्ये 238 सीट्स असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी नॉन-स्टॉप उड्डाणे चालविली जातील. (India-Israel flight)

हेही वाचा-पालिका प्रसूतिगृहांचे सोशल ऑडिट होणार ; High Court कडून समिती स्थापन, अहवाल सादर करण्याचे निर्देश

दरम्यान इस्रायलचे पर्यटन मंत्री हैम काट्झ यांनी सांगितले की, आवश्यक मंजुरीनंतर दिल्ली-तेल अवीव मार्गावर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया आणि इस्रायली एअरलाइन ईआय-एआय द्वारे मुंबई ते तेल अवीव थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे. (India-Israel flight)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.