India-Maldives Dispute : लक्षद्वीपमध्ये उघडली युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा; स्थानिकांसह पर्यटकांना होणार लाभ

India-Maldives Dispute : ही बँक स्थानिक लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. तसेच, येथे येणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल.

154
India-Maldives Dispute : लक्षद्वीपमध्ये उघडली युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा; स्थानिकांसह पर्यटकांना होणार लाभ
India-Maldives Dispute : लक्षद्वीपमध्ये उघडली युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा; स्थानिकांसह पर्यटकांना होणार लाभ

भारत आणि मालदीव यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India ) लक्षद्वीपमधील (Lakshadweep) अगत्ती बेटावर एक शाखा सुरू केली आहे. (India-Maldives Dispute) लक्षद्वीपमधील युनियन बँक ऑफ इंडियाची ही पहिली शाखा आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. मणिमेखला यांच्या हस्ते या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : दोघांचे प्राण घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार)

बँकेच्या या शाखेत बचत आणि चालू खाती, कर्ज उत्पादनांपासून ते संपत्ती व्यवस्थापन, विमा तसेच एटीएम आणि सीडीएमपर्यंतच्या सेवा उपलब्ध असतील. ही बँक स्थानिक लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. तसेच, येथे येणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल.

लक्षद्वीप का महत्त्वाचे ?

जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. केरळच्या किनाऱ्यालगतच्या लक्षद्वीप या दक्षिण भारतीय बेटांच्या साखळीतील समुद्रकिनाऱ्यावर स्नॉर्केलिंग आणि फिरतानाचे स्वतःचे फोटो मोदींनी सोशल प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये भारताच्या सुंदर शेजारी मालदीवचा उल्लेख केला नाही, परंतु त्यामुळे द्वीपसमूहातील या निसर्गरम्य दृश्यांबद्दलचे मोदींचे कौतुक मालदीवऐवजी लोकांना लक्ष्यद्वीपकडे आकर्षित करू शकते, या भीतीने मालदीवच्या तीन मंत्र्यांनी थयथयाट करत भारताचे पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली. त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मालदीवच्या तीन मंत्र्यांनी मोदी यांना ‘जोकर’, ‘दहशतवादी’ आणि ‘इस्रायलची कठपुतळी’ असे अपशब्दही वापरले. त्यामुळे मालदीवमध्ये पर्यटनाला जाण्यावर अनेक भारतियांनी बहिष्कार घातला. या वेळी भारतीय नागरिक आणि सेलिब्रिटींनी मालदीव सोडून देशांतर्गत समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर लक्ष्यद्वीपला मोठे महत्त्व आले आहे. (India-Maldives Dispute)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.