India-Maldives Trade : भारत ‘या’ गोष्टी मालदीवला करणार निर्यात

India-Maldives Trade : भारत मालदीव्जला गहू, तांदूळ, साखर निर्यात करणार आहे.

269
India-Maldives Trade : भारत ‘या’ गोष्टी मालदीवला करणार निर्यात
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध गेल्या काही महिन्यात थोडे ताणले गेले आहेत. पण, त्याचवेळी व्यापारी संबंधांमध्ये मात्र नवीन करार मदार होत आहेत. अलीकडेच भारताने मालदीवला काही वस्तूंच्या निर्यातीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारत मालदीवला आता तांदूळ, गहू, साखर आणि कांद्याची निर्यात करणार आहे. मालदीव सरकारनं जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची विनंती भारताला केली होती, त्यानुसार भारताने मालदीवला मदत करण्याचा निर्णय घेतलाय. (India-Maldives Trade)

भारत-मालदीव यांच्यात एक महत्वाचा करार झाला आहे. या करारानुसार भारत मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, कांदा, साखर या वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, भारतानं या सर्व वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत भारतानं मालदीवला या वस्तू निर्यात करण्याचा निर्णय घेतलाय. यामाध्यमातून भारत-मालदीव यांच्यातील व्यापार वाढणार आहे. तसेच या व्यापारातून मोठी उलाढाल होणार आहे. (India-Maldives Trade)

दरम्यान, मालदीवने भारताला जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करण्याची विनंती केली होती. त्यानुसार भारतानं मालदीवला जीवनावश्यक वस्तू निर्यात करण्याचा निर्णाय घेतलाय. मात्र, भारत मर्यादीतच निर्यात करणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, भारत हा साखर, तांदूळ आणि कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशातून या वस्तूंची परदेशात निर्यात केली जाते. अनेक शेजारील देश भारतावर अवलंबून आहेत. दरम्यान, सध्या भारतानं अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातलीय. तर काही वस्तूंच्या निर्यातीवर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. देशांतर्गत बाजारात कोणत्याही वस्तूंच्या दरात वाढ होऊ नये याचा प्रयत्न सरकार करत आहे. (India-Maldives Trade)

(हेही वाचा – Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात?)

मालदीव देखील भारताला वाळू आणि दगड निर्यात करणार

मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताकडून मालदीवला मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाणार आहे. भारताकडून मालदीवला ३५,७४९ टन कांदा, ६४,४९४ टन साखर, १,२४,२१८ तांदूळ आणि १,०९,१६२ टन गहू मालदीवला निर्यात केला जाणार आहे. दरम्यान, मालदीव देखील भारताला वाळू आणि दगड निर्यात करणार आहे. मालदिव भारताला १० लाख टन वाळू आणि दगडांचा पुरवठा करणार आहे. (India-Maldives Trade)

दरम्यान, भारत आणि मालदीव यांचे संबंध एवढे चांगले नाहीत. काही प्रमाणात संबंध बिघडलेले आहेत. अशा काळात भारत मालदीवला सहकार्य करणार आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार स्थापन झालं आहे. हे नवीन सरकार चीनकडे झुकल्याचे मानले जात आहे. मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी नुकतीच चीनला भेट दिलीय. पण दरवेळी मालदिवचे नवीन राष्ट्राध्यक्ष भारताला भेट देत असतात. पण यावेळी चीनला भेट दिली आहे. (India-Maldives Trade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.