लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले

74
लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले
लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले

चीन (China) त्याच्या होटन प्रांतात दोन नवीन तालुके (काऊंटी) निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या तालुक्यांचा काही भाग लडाखमध्ये येतो. लडाखवर चीनचे बेकायदेशीर नियंत्रण भारताने कधीच मान्य केलेले नाही. चीनने नवीन तालुके घोषित केल्याने भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही याविषयी तक्रार केली आहे, असे परखड उद्गार भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी काढले आहेत.

(हेही वाचा – ED ची धडक कारवाई; मुंबईसह दिल्लीत 14 ठिकाणी छापेमारी, 4,957 कोटींचा कर्ज घोटाळा)

रणधीर जैस्वाल (Randhir Jaiswal) यांनी म्हटले की, चीन तिबेटमधील यार्लुप त्यांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीवर वीज निर्मितीशी संबंधित प्रकल्पावर काम करत आहे. या नदीचे पाणी भारताला मिळते आणि आम्ही ते वापरतो. त्यामुळे आम्ही सतत राजनैतिक माध्यमातून चीनसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

या वेळी त्यांनी पाकविषयीही वक्तव्य केले. पाकिस्तानचे (Pakistan) उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताशी पुन्हा चर्चा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर रणधीर जैस्वाल म्हणाले, ‘संवाद (टँगो) करण्यासाठी दोघांची आवश्यकता असते.’ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, पाकिस्तानच्या संदर्भात ‘टी’चा अर्थ ‘टँगो’ नसून ‘टेररिझम्’ (आतंकवाद) आहे.

जैस्वाल यांनी या वेळी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलेले, ‘भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ मालदीवमधील (Maldives) मुईज्जू यांना सत्तेवरून हटवू इच्छित नव्हती’, हे वृत्त फेटाळून लावले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.