India, Qatar Alliance : मनी लाँडरिंग रोखण्यासाठी भारत व कतार येणार एकत्र

India, Qatar Alliance : दहशतवादाचा एकत्र मुकाबला करण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे. 

29
India, Qatar Alliance : मनी लाँडरिंग रोखण्यासाठी भारत व कतार येणार एकत्र
  • ऋजुता लुकतुके

भारत व कतार देशांनी दहशतवादाला रोखण्याचा संयुक्त उपाय म्हणून देशाबाहेरून होणारे मनी लाँडरिंगचे प्रकार रोखण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं आहे. मंगळवारी भारत आणि कतारच्या प्रतिनिधी मंडळाची यावर एक सविस्तर बैठकही झाली. दहशतवाद थांबवायचा असेल तर त्यांना होणारा वित्त पुरवठा थांबवायला हवा आणि त्यासाठी होणारे आर्थिक गैरव्यवहार थांबायला हवेत. हे गैरप्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असल्यामुळे एका देशाच्या यंत्रणेला ते थांबवणं सोपं जात नाही. अशावेळी दोन देशांच्या सरकारांनी एकत्र येणं हा त्यामागचा एक उपाय असू शकतो. त्यातूनच भारत आणि कतार एकत्र आले आहेत. सायबर सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाईन मालमत्तेची सुरक्षा या माध्यमातून मनी लाँडरिंग थांबवण्याचा प्रयत्न दोन्ही देश एकत्रपणे करणार आहेत. (India, Qatar Alliance)

(हेही वाचा – US Election Results: २७७ बहुमताचा आकडा गाठत Donald Trump ठरले अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष)

दोन्ही देशांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखांचे प्रतिनिधी त्यासाठी मंगळवारी नवी दिल्लीत भेटले. कतारच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व शेख अहमन अल थानी यांनी केलं. तर भारतीय पथकाचे प्रमुख विवेक अगरवाल होते. दोन्ही देशांमध्ये सध्या कार्यरत असलेली प्रणाली तपासणं आणि मग त्यात बदल सुचवणं ही पहिली पायरी असणार आहे. सुरुवातीला याच मुद्यांवर चर्चा झाल्याचं समजतंय. (India, Qatar Alliance)

(हेही वाचा – Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप)

मागच्या काही वर्षांत भारताने आर्थिक सुरक्षेच्या बाबतीत तंत्रज्ञानाच्या मदतीने बरीच मजल गाठली आहे. जागतिक स्तरावरील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी स्थापन झालेल्या कृती दलाने त्यासाठी भारताचं कौतुकही केलं आहे. भारतातील यंत्रणा ही फ्रान्स, युके आणि इटली यांच्या तोलामोलाची असल्याचा निर्वाळा या कृतीदलाने दिला आहे. पण, त्याचवेळी भारतात मनी लाँडरिंगचे काही खटले अजूनही प्रलंबित आहेत. ते मार्गी लावण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत असं मतही कृती दलाने मांडलं होतं. भारतातील तंत्र सज्जतेची मदत आता कतारलाही होणार आहे. (India, Qatar Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.