परदेशी मदतीचा काय आहे लेखाजोखा? वाचा… 

विदेशातून येणाऱ्या मदतीचे सुव्यवस्थापन करून त्यांचे आवश्यकतेनुसार राज्यांमध्ये वितरण करण्याच्या दृष्टीने विविध मंत्रालये समन्वय ठेवून कार्यरत आहेत.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशभरात आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे मृत्यूचे तांडव सुरु आहे. अशा वेळी भारताच्या मदतीसाठी अनेक मित्र राष्ट्र धावून आले आहेत. कोरोनासंबंधी वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा ओघ सुरु झाला आहे. २७ एप्रिल २०२१ पासून विदेशातून  मदतीचा ओघ सुरु झाला  असून त्याचे देशभरात कसे वितरण करण्यात आले, याचा लेखाजोखा केंद्र सरकारने जाहीर केला आहे.

मदतीच्या वितरणासाठी समिती स्थापन 

ही मदत २७ एप्रिल ते ११ मे २०२१ या दरम्यान  झालेली आहे. विदेशातून येणाऱ्या मदतीचे सुव्यवस्थापन करून त्यांचे आवश्यकतेनुसार राज्यांमध्ये वितरण करण्याच्या दृष्टीने विविध मंत्रालये समन्वय ठेवून कार्यरत आहेत. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ११ मे २०२१ रोजी अमेरिका, इजिप्त, कुवेत आणि द. कोरिया यांच्याकडून एकाच दिवशी बरीच मदत आली आहे. यात ऑक्सिजन काँसंट्रेटर ८०, ऑक्सिजन सिलिंडर १,५९० आणि व्हेंटिलेटर्स  – २० असे या साहित्यांचे विवरण आहे.

(हेही वाचा : म्युकरमायकोसीसच्या विरोधात लढण्यासाठी भारत सरकारने उचलले ‘हे’ पाऊल)

आतापर्यंत किती आली मदत? 

  • ऑक्सिजन काँसंट्रेटर  – ९,२८४
  • ऑक्सिजन सिलिंडर – ७,०३३
  • ऑक्सिजन जनरेशन प्लांट – १९
  • व्हेंटिलेटर्स  – ५,९३३
  • रेमडेसिवीर – ३.४४ लाख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून मदतीचा ओघ सुरु असताना त्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत, मात्र ती मदत किती आहे आणि त्यांचे वितरण कसे आणि कुठे झाले आहे, याची माहिती जनतेला नसते, त्याचा लेखाजोखा केंद्र सरकारने द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here