देशात सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ वेगाने होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ३ हजार १६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील सहा महिन्यांतील ही सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ आहे.
https://twitter.com/ANI/status/1641300075010998272
गेल्या २४ तासांत देशातील १ हजार ३९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या १३ हजार ५०९ रुग्ण सक्रिय आहेत. २९ मार्चला सक्रिय रुग्णांचा आकडा हा ११ हजार ९०३ होता.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील एका दिवसांत १४ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशात ४.४७ कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याशिवाय एकूण ४ कोटी ४१ लाख ६८ हजार ३२१ लोक बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनाचे २२०.६५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान भारतात दररोज नोंदवल्या जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत काही पटींने वाढ होत आहे. यात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांत रुग्ण वाढल्याचे केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच या राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विशेष काळजी घेण्याची सूचना केली होती.
(हेही वाचा – केंद्र सरकार सतर्क! ६ राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एप्रिलमध्ये मॉक ड्रिल)
Join Our WhatsApp Community