India-Russia Bilateral Trade : भारत-रशिया द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज अमेरिकन डॉलरवर नेण्याचा निर्धार

India-Russia Bilateral Trade : २०३० सालापर्यंत टप्प्या टप्प्याने हा व्यापार वाढवत नेण्याचं उद्दिष्टं आहे.

144
India-Russia Bilateral Trade : भारत-रशिया द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज अमेरिकन डॉलरवर नेण्याचा निर्धार
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध आणखी वृद्धिंगत करून दोन्ही देशांमधील व्यापार १०३० पर्यंत १०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर नेण्याचा निर्धार उभय देशांच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परस्पर परकीय गुंतवणूक, देशांच्या स्थानिक चलनांमध्ये व्यापार तसंच ऊर्जा, कृषि आणि पायाभूत सुविधा उभारणीत परस्पर सहाय्याचं धोरण ठेवण्यात आलं आहे. (India-Russia Bilateral Trade)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. आणि तिथे रशियन पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांच्या हस्ते मोदींना रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. त्याचवेळी दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य कराराची २२ वी फेरीही पार पडली. त्यात व्यापारविषयक काही महत्त्वाचे निर्णय दोन्ही देशांनी जाहीर केले आहेत. (India-Russia Bilateral Trade)

(हेही वाचा – भूखंड घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे CM Siddaramaiah यांच्याविरोधात तक्रार दाखल)

चर्चा आणि करारादरम्यान नऊ मुद्दे समोर आले आहेत
  • रशियन सेवा आणि उत्पादनांसाठी भारतात मुक्त व्यापार कॉरिडॉर
  • उभय देशांमधील व्यापार स्थानिक चलनांमध्ये करण्यासाठी करार. भारताला रशियाकडून खासकरून कच्चं तेल हवं आहे. ते रुपयांत खरेदी करता यावं अशी भारताची मागणी आहे. आणि त्या बदल्यात तितक्या रकमेचा माल रशियाने भारतातून भारतीय रुपयांत खरेदी करण्याला भारताची परवानगी आहे. अशा प्रकारच्या करारावर स्वाक्षरी अपेक्षित आहे
  • दोन्ही देशांदरम्यान नवीन व्यापारी वाहतूक मार्ग खुले व्हावेत यासाठी प्रयत्न. नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, नॉर्दन सी रुट, चेन्नते ते व्लादिवोस्टोक समुद्री मार्ग भारतासाठी खुले करण्याची भारताची मागणी
  • भारतीय कृषि माल, अन्न व रसायनं यासाठी रशियन बाजारपेठ खुली करण्याची मागणी
  • अणूऊर्जा, तेल प्रक्रिया व पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात भारताला रशियाकडून सहकार्याची अपेक्षा
  • कार उत्पादन, जहाज बांधणी, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा या क्षेत्रातही रशियाबरोबर सहकार्याने काम करण्याची भारताला अपेक्षा
  • रशियात भारतीय मेडिकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेची चाचपणी
  • शिक्षण, तंत्रज्ञान, विज्जान, क्रीडा, संस्कृती व इतर क्षेत्रात परस्पर देवाण घेवाणीसाठी पोषक वातावरण तयार करण्याची योजना
  • वैद्यकीय सेवा व वैद्यकीय आधुनिक तंत्रज्ञान यांची परस्पर देवाण घेवाण व्हावी यासाठी प्रयत्न करणार

उभय देशांनी परस्पर सहकार्याच्या अंमलबजावणीसाठी एक आयोग नेमावा असा निर्णय मोदी-पुतिन भेटीत घेण्यात आला आहे. (India-Russia Bilateral Trade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.