India Smart Cities Council 2023 : इंदोर इथे २६-२७ सप्टेंबर रोजी होणार भारत स्मार्ट शहर परिषद , १०० स्मार्ट शहरे होणार सामील

या कार्यक्रमाद्वारे या शहरांनी देशात भविष्यात नागरी परिवर्तनातील त्यांचे उल्लेखनीय काम जगासमोर ठेवण्यासाठी मंच उपलब्ध होणार आहे.

188
India Smart Cities Council 2023 : इंदोर इथे २६-२७ सप्टेंबर रोजी होणार भारत स्मार्ट शहर परिषद , १०० स्मार्ट शहरे होणार सामील
India Smart Cities Council 2023 : इंदोर इथे २६-२७ सप्टेंबर रोजी होणार भारत स्मार्ट शहर परिषद , १०० स्मार्ट शहरे होणार सामील

नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने २६-२७ सप्टेंबर २०२३ दरम्यान ब्रीलीयंट कन्वेन्शन सेंटर, इंदोर, मध्य प्रदेश इथे, भारत स्मार्ट शहरे परिषद २०२३ (India Smart Cities Council 2023)चे आयोजन करत आहे. या परिषदेत सर्व १०० स्मार्ट शहरे सामील होतील. ही शहरे, नागरी नवोन्मेशाच्या अग्रभागी आहेत आणि नागरी विकासाच्या माध्यमातून अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. या कार्यक्रमाद्वारे या शहरांनी देशात भविष्यात नागरी परिवर्तनातील त्यांचे उल्लेखनीय काम जगासमोर ठेवण्यासाठी मंच उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २७ सप्टेंबर २०२३ रोजी भारत स्मार्ट शहरे स्पर्धा २०२२ (ISAC)च्या विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल. स्मार्ट शहरे मोहीम, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार द्वारे २०१८ पासून ISAC चे आयोजन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेला हा महत्वाचा निर्णय आहे, ज्यात पथदर्शी शहर नियोजन, प्रकल्प आणि विकास संकल्पना राबविल्या आहेत, त्यांची दखल घेतली जाते आणि उल्लेखनीय कामगिरी, समकक्ष सहकाऱ्यांकडून शिकणे आणि सर्वोत्तम पद्धतींचा प्रचार करणे यांना पुरस्कृत केले जाते. या परिषदेत मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई सी पटेल, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय श्रम आणि रोजगार, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री, इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, रेल्वे, कौशल किशोर, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री अश्वनी वैष्णव, मध्य प्रदेशचे नगर विकास मंत्री भूपेंद्र सिंग, हे मान्यवर उपस्थित राहतील.

या व्यतिरिक्त मध्य प्रदेश सरकारचे वरिष्ठ अधिकारी, महापौर, तसेच १०० स्मार्ट शहरांचे आयुक्त, उद्योग क्षेत्रातले सहकारी, शिक्षण तज्ज्ञ आणि स्मार्ट शहरांशी संबंधित सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम २६ आणि २७ सप्टेंबर २०२३ असा दोन दिवस आयोजित केला जावा, असा प्रस्ताव होता. या परिषदेच्या पहिल्या दिवशी, आयएसएसी २०२२ अंतर्गत करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त प्रकल्पांची माहीती देणारे प्रदर्शन आयोजित केले जाईल. त्यासोबतच, स्मार्ट सिटीजच्या मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांसोबत संवाद तसेच, इंदूर आणि उज्जैन इथे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांना भेट देणे, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा :Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा केंद्राचे उद्घाटन)

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, आयएसएसी २०२२ पुरस्कारांचे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण होईल. पांच राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि ३१ विशेष शहरांना तसेच सात भागीदार संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. यंदा ‘आयएसएसी’ पुरस्कारांसाठी ६६ जणांची निवड करण्यात आली आहे, त्याशिवाय, स्मार्ट सिटी मिशन चार अहवाल प्रकाशित करणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.