भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक; ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ संस्थेचा अहवाल

270

लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनच्या पुढे गेला आहे. ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ (डब्ल्यूपीआर) संस्थेने याबाबत अहवाल जारी केला आहे. त्यावरून लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे.

( हेही वाचा : अभिनेत्री राखी सावंतला अटक, नेमके काय आहे प्रकरण? )

भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 50 लाखांनी जास्त

‘डब्ल्युपीआर’च्या अहवालानुसार 18 जानेवारी 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या ही 1.423 अब्ज झाली आहे. भारताने चीनला लोकसंखेच्या बाबतीत मागे टाकले आहे. डब्ल्यूपीआर या संस्थेने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरुन भारत हा जगभरातील सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश झाला आहे. या संस्थेनुसार भारताची लोकसंख्या ही तब्बल 1.417 बिलियन म्हणजे 140 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. भारताची लोकसंख्या ही चीनपेक्षा 50 लाखांनी जास्त आहे. मंगळवारी चीनची लोकसंख्या ही 1.412 बिलियन एवढी होती. चीनची लोकसंख्या 1961 नंतर पहिल्यांदाच कमी झाली आहे. भारताची लोकसंख्या ही 30 वर्ष वयोगटापेक्षा कमी आहे. या अहवालानुसार पुढील काही वर्षात भारत जगातील वेगवान विकास करणारा देश होणार आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था देखील सर्वात मोठी होणार आहे.

रोजगार देण्याचे मोठे आव्हान

यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने भारताबाबत वेगळा अनुमान लावला होता. या वर्षाच्या शेवटी भारत चीनला लोकसंख्येबाबत मागे टाकेल असा अंदाज होता. मात्र, या वर्षांच्या सुरुवातीलाच भारताने लोकसंख्येच्या बाबतील मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्र महासंघाने दिलेल्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या ही तब्बल 1.668 अब्ज होण्याची शक्यता आहे. डब्ल्यूपीआरने दिलेल्या अहवालानुसार 18 जानेवारी 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.423 अब्ज झाली आहे. तर डब्ल्यूपीआर सोबथ रिसर्च प्लॅटफॉर्म मेक्रोट्रेंडसनुसार भारताची लोकसंख्या ही आता 1.428 एवढी आहे. कोरोनामुळे भारताने लोकसंख्या मोजणी ही थांबवली होती. वाढत्या लोकसंख्येसोबतच भारत हा सर्वाधिक तरुण असलेला देश होणार आहे. देशातील तरुणांना रोजगार देण्याचे मोठे आव्हान हे मोदी सरकार पुढे राहणार आहे. दरवर्षी लाखो रोजगार निर्मिती सरकारला करावी लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.