भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढतेय; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

157

रशिया – युक्रेन युद्धाचा परिणाम सगळ्या जगावर होत आहे. अनेतक देशांमध्ये अर्थव्यवस्था संकटात आहे. अशा परिस्थितीत भारताचा विकासदर 6.4 टक्के राहील. गेल्या वर्षीच्या 8.8 टक्क्यांपेक्षा हा विकासदर कमी असला तरीही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.

जागतिक स्तरावर महागाईच्या दबावात वाढ

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि शक्यता अहवालात म्हटले आहे की, साथीच्या रोगामुळे नाजूक झालेली अर्थव्यवस्था युक्रेनमधील युद्धामुळे पुन्हा संकटात सापडली असून, जागतिक स्तरावर महागाईचा दबाव वाढला आहे.

( हेही वाचा: ज्ञानव्यापी मंदिराप्रमाणे मुस्लिम आक्रमणाची  पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरालाही बसलेली झळ, पण… )

इतर देशांचा विकासदर

अमेरिका, युरोपियन महासंघातील देश आणि चीनच्या विकासदरात घट करण्यात आली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था 2022 मध्ये 2.6 टक्के आणि पुढील वर्षी 1.8 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. चीनची अर्थव्यवस्था 2022 मध्ये 4.5 टक्के आणि 2023 मध्ये 5.2 टक्के वाढण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांमध्ये सरासरी 4.1 टक्क्यांनी विकासदर वाढेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.