भारतात रेमडेसिवीरचा साठा वाढणार… केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

अमेरिकेतील मेसर्स गिलियड सायन्सेस कंपनी पुढील एक ते दोन दिवसांत 75 हजार ते 1 लाख वायल पाठवेल, अशी अपेक्षा आहे.

अत्यावश्यक अशा रेमडेसिवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी, केंद्र सरकारने इतर देशांकडून रेमडेसिवीर आयात करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा देशात होणारा तुटवडा कमी करण्यास मदत होणार आहे. 75 हजार वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचणार असल्याचे, रसायन व खते मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

या कंपन्यांकडून करणार आयात

भारत सरकारच्या मालकीच्या एचएलएल लाइफकेअर लि. या कंपनीने अमेरिकेतील मेसर्स गिलियड सायन्सेस आणि इजिप्शियन औषध कंपनी, मेसर्स ईवा फार्माकडून रेमडेसिवीरच्या 4 लाख 50 हजार वायल मागवल्या आहेत. गिलियड सायन्सेस आयएनसी पुढील एक ते दोन दिवसांत 75 हजार ते 1 लाख वायल पाठवेल, अशी अपेक्षा आहे. 15 मे किंवा त्याआधी आणखी एक लाख वायल पाठवणार असल्याचे समजते. ईवा फार्मा सुरुवातीला अंदाजे 10 हजार वायल पाठवेल आणि त्यानंतर दर 15 दिवसांनी किंवा जुलै पर्यंत 50 हजार वायल पाठवेल.

(हेही वाचाः लसीचा पहिला डोस घेतल्यावर कोरोना झाल्यास कधी घ्याल ‘दुसरा’ डोस? ‘एम्स’च्या तज्ज्ञांनी दिले उत्तर)

देशांतर्गत उत्पादन वाढले

सरकारने देशातील रेमडेसिवीरची उत्पादन क्षमता वाढवली आहे. देशांतर्गत सात परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा 38 लाख वायलवरुन वाढून 1.03 कोटी वायल झाली आहे. गेल्या सात दिवसांत औषध कंपन्यांनी देशभरात एकूण 13.73 लाख वायालचा पुरवठा केला आहे. 11 एप्रिल रोजी दररोज 67 हजार 900 वायल इतका पुरवठा होत होता. यात वृद्धी होऊन 28 एप्रिल 2021 रोजी हा आकडा 2.09 लाख वायल इतका झाला. रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सल्ले-सूचना जारी केल्या आहेत.

किंमतही झाली कमी

भारतात रेमडेसिवीरची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. सर्वसामान्य जनतेस हे इंजेक्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी, एनपीपीएने 17 एप्रिल 2021 रोजी सुधारित किरकोळ किंमत जाहीर करत सर्व प्रमुख ब्रँडची किंमत प्रति वायल 3 हजार 500 रुपयांपेक्षा कमी केली. रेमडेसिवीरचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता सुलभ करण्यासाठी, महसूल विभागाने 20 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन वरील सीमा शुल्क माफ केले आहे.

(हेही वाचाः ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी कोरोनाबाधित रुग्णांना ठरतेय फायदेशीर!)

22 एप्रिल 2021 रोजी एम्स/आयसीएमआर, कोविड-19 राष्ट्रीय कृती दल, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख समूहाने प्रौढ कोविड-19 रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी क्लिनिकल मार्गदर्शनाद्वारे राष्ट्रीय उपचार प्रोटोकॉल अद्ययावत केले आहेत. सुधारित प्रोटोकॉल औषधांच्या योग्य वापरास प्रोत्साहित करेल आणि मागणीनुसार पुरवठा करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here