राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांच्यात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या भेटीत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणि परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. (India-U.S)
(हेही वाचा – Navi Mumbai International Airport ‘या’ महिन्यापासून सुरू होणार; गौतम अदानी यांनी घेतला कामाचा आढावा)
अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुप्तचर प्रमुखांच्या परिषदेत गॅबार्ड यांच्यासह कॅनडाचे सर्वोच्च गुप्तचर अधिकारी डॅनियल रॉजर्स आणि ब्रिटीश गुप्तचर संस्था एमआय-6 प्रमुख रिचर्ड मूर हे देखील उपस्थित होते. या परिषदेत दहशतवाद आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांसह विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. तुलसी गबार्ड अनेक देशांच्या यात्रेवर असून त्यानंतर्गत त्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारत भेटीनंतर तुलसी गबार्ड जपान आणि थायलंडला जाणार आहे. तुलसी गबार्ड स्वतःला ‘चाईल्ड ऑफ द पॅसिफिक’ म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर गबार्ड यांचा हा दुसरा विदेश दौरा आहे. यापूर्वी त्यांनी जर्मनीला जाऊन म्युनिक सुरक्षा परिषदेत भाग घेतला होता. (India-U.S)
(हेही वाचा – मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार; Jaykumar Gore यांची घोषणा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलसी गबार्ड यांना रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार त्या मंगळवारी 18 मार्च रोजी यात सहभागी होणार आहे. या परिषदेत गबार्ड भारत आणि इतर देशांच्या अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. रायसीना डायलॉग हे एक व्यासपीठ आहे जेथे भू-राजकारण, भू-अर्थशास्त्राशी संबंधित जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते. तुलसी गबार्ड भारतीय थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे (ओआरएफ) अध्यक्ष समीर सरन यांची भेट घेणार असून या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. (India-U.S)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community