भारत – संयुक्त अरब अमिरातीचा संयुक्त लष्करी सराव ‘डेझर्ट सायक्लोन’ च्या पहिल्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी 45 जवानांचा समावेश असलेली संयुक्त अरब अमिरातीच्या पायदळाची तुकडी भारतात आली आहे. हा सराव 15 जानेवारीपर्यंत महाजन, राजस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे. यूएईच्या तुकडीचे प्रतिनिधित्व झायेद फर्स्ट ब्रिगेडच्या सैन्याने केले आहे. 45 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व मुख्यत्वे मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या बटालियनद्वारे केले जात आहे. (Desert Cyclone)
संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम सनदेच्या अध्याय VII अंतर्गत वाळवंटी, निम वाळवंटी प्रदेशात बिल्ट-अप एरिया (FIBUA) म्हणजेच बांधकाम क्षेत्रात लढाईसह उप-पारंपरिक मोहिमांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे शांतता मोहीमां दरम्यान दोन्ही बाजूंमधील सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढेल. (Desert Cyclone)
(हेही वाचा : Argentina Jersey No 10 : अर्जेंटिना फुटबॉल संघातून १० क्रमांकाची जर्सी निवृत्त होणार)
‘डेझर्ट सायक्लोन’ या लष्करी सरावा दरम्यान संयुक्त देखरेख केंद्राची स्थापना, घेराव आणि शोध मोहिमा , बांधकाम क्षेत्राचे वर्चस्व आणि हेलिकॉप्टर्सद्वारे हेलिबोर्न मोहिमा याचा सराव करण्याचे नियोजन आहे. हा सराव सहकार्यात्मक भागीदारी वाढवेल आणि दोन्ही बाजूंमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यात मदत करेल.‘डेझर्ट सायक्लोन’ हा सराव भारत आणि यूएई यांच्यातील मैत्री आणि विश्वासाचे बंध अधिक दृढ होण्याचे प्रतीक आहे. सामायिक सुरक्षा उद्दिष्टे साध्य करणे आणि दोन मैत्रीपूर्ण राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत हे या सरावाचे उद्दिष्ट आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community