-
ऋजुता लुकतुके
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा अमेरिका दौरा आता संपला आहे आणि या दौऱ्याचं सगळ्यात मोठं फलित म्हणजे भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत ५०० दशलक्ष अब्ज अमेरिकन डॉलरवर नेण्याचा संकल्प दोन्ही देशांनी सोडला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. परस्परपूरक असं नवीन व्यापारी धोरण ठरवण्यावर दोन्ही देश एकत्रपणे काम करतील, असंही मोदींनी म्हटलं आहे. ‘आम्ही दोघांनी मिळून एक उद्दिष्टं ठरवलं आहे. द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा. त्यासाठीच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर प्रशासकीय अधिकारी काम करतील,’ असं पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत म्हणाले. (India-US Trade)
त्यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या पश्चिम लॉबीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतल्यानंतर साधारण एक तास उभय नेत्यांमध्ये व्यापारी धोरणाविषयी चर्चा झाली. भारतासाठी अमेरिका हा सगळ्यात मोठा व्यापारी मित्र आहे. पण, अमेरिकेसाठी २०२४ सालातील व्यापाराचा विचार करता भारताचा क्रमांक दहावा लागतो. याकडे अमेरिकनं लक्ष वेधलं आहे. २०२४ मध्ये उभय देशांतील व्यापार हा १२९ दशलक्ष अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता आणि तो पुढील ५ वर्षांत दुपटीने वाढवण्यावर नेत्यांमध्ये चर्चा झाली. (India-US Trade)
(हेही वाचा – CC Road : पाली हिलमधील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट रस्ते काँक्रिटीकरणास आयुक्तांनी दिली स्थगिती)
दोन्ही देश येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता व सेमी कन्डक्टरच्या उत्पादनावर एकत्र काम करतील, असं या बैठकीत ठरल्याचं पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत म्हणाले. ट्रम्प यांना भेटण्यापूर्वी नरेंद्र मोदी अमेरिकेत टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्झ तसंच भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक विवेक रामस्वामी यांना भेटले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यात उभयपक्षी व्यापारावर चर्चा झाली. ट्रम्प यांनी भारताला अमेरिकेकडून सुरक्षा सामुग्री विकत घेण्याचं आवाहन केलं. तसंच ट्रम्प यांच्या पहिल्या कालावधीत भारतात खूप मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क होतं, त्याचा फेरआढावा घेण्याची विनंती केली. (India-US Trade)
दोन्ही नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही ट्रम्प यांनी हाच मुद्दा बोलून दाखवला. ‘आम्ही बैठकीत आयात शुल्क कमी करण्यावर बोललो आणि पंतप्रधान मोदींनीही मला तसं आश्वासन दिलं आहे. शुल्क कमी करुन व्यापारातील फरक कमी करण्यावर आता ते काम करतील आणि त्यानंतर दोन्ही देश नवीन व्यापारी कराराने जोडले जातील. त्यावर आता आम्ही काम करत आहोत,’ असं ट्रम्प पत्रकारांना उद्देशून म्हणाले. नरेंद्र मोदींची भेट घेण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी शुल्क वाढीविषयी गंभीर विधान केलं आहे. त्याचं प्रशासन व्यापारी मित्रांबरोबर ते लावतात त्या प्रमाणात शुल्क आकारण्यासाठी कटीबद्ध आहे आणि अशा विधेयकावर स्वाक्षरी केल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. पण, ही वाढ अजून लागू झालेली नाही. तसंच फार्मा आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांना सध्या शुल्कवाढ करण्यात येणार नाहीए. एकूणच ट्रम्प शुल्कवाढीवर अजूनही आक्रमक असेल तरी त्यांनी काही बाबतीत आस्तेकदम चालण्याचंही धोरण ठेवलं आहे. (India-US Trade)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community