देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या लसीकरणाची मोहीम आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहचली आहे. लसीकरणाबाबत भारत नवनवीन विक्रम मोडत आहे. त्यातील एक मोठा विक्रम भारत पुढच्या आठवड्यात मोडीत काढणार आहे.
शंभर कोटीचा टप्पा पार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अशातच भारतात कोरोनाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. भारताने त्यात मोठी बाजी मारली आहे. त्याची आता आरोग्य मंत्रालयाने सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. कारण लवकरच भारत एक अब्ज लसींचे डोस देण्याचा विक्रम करणार आहे. यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सरकार विचार करत आहे. पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे लक्ष्य साध्य केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय संपूर्ण भारतभर कार्यक्रमांसह हा दिवस साजरा करण्याची योजना आखत आहे. यामध्ये कोविड -19 योद्धा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे, जे लसीकरण मोहिमेमध्ये सर्वात प्रमुख आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड -19 लसीकरण 96.78 कोटी पार केले आहे. ज्यात बुधवारी संध्याकाळी 7 पर्यंत 32 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. 10 ऑक्टोबर रोजी देशात लसीकरणाची संख्या 95 कोटींवर पोहोचल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी स्तुती केली होती.
(हेही वाचा : आर्यन खान आजचीही रात्र तुरूंगातच काढणार!)
Join Our WhatsApp Community