गुगल प्ले (Indian Apps) स्टोअरवरून १मार्चला गुगले १० भारतीय अॅप्स प्ले स्टोअरवरून (Indian Apps Play Store) काढून टाकले. सर्वोच्च न्यायालयानेही प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. आता या प्रकरणी रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी या मुद्द्याबाबत कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
गुगल प्ले स्टोअरवरून 10 भारतीय अॅप्स हटवल्यानंतर केंद्र सरकारने गुगलविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत प्ले स्टोअरवरून अॅप्स काढून टाकण्याची परवानगी दिली जाणार नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आमचे सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे आणि बिल भरण्याचा वाद सोडवण्यासाठी गुगल आणि प्ले स्टोअरवरून हटविलेल्या अॅप्सवर पुढील आठवड्यात बैठक होईल.
(हेही वाचा – Manori Road : मनोरी गावातील रस्ते होणार टकाटक )
‘हे’ अॅप्स गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले –
गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलेल्या अॅप्समध्ये Shaadi.com, Bharat Matrimony, Matrimony.com, Naukri.com, Kuku FM, 99acres, Stage, QuackQuack, Alt बालाजी (Alt) यांचा समावेश आहे.
गुगलने ब्लॉग पोस्टमध्ये काय म्हटले?
ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने म्हटले आहे की, त्यांनी १० विकासकांना तयारीसाठी ३ वर्षांहून अधिक वेळ दिला आहे. ज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ३ आठवड्यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर कोणत्याही धोरणांच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करत असताना त्यांची धोरणे संपूर्ण प्रणालीमध्ये लागू राहतील याची ते खात्री करत आहेत.
गुगलने आपल्या अॅप्ससाठी तीन पेमेंट पर्याय दिले आहेत –
उपभोग-आधारित भरणा (कंजप्शन बेसिस पेमेंट): हा पर्याय कोणत्याही सेवा शुल्काशिवाय काम करण्यास परवानगी देतो. मग तो सशुल्क सेवेचा भाग असो वा नसो.
गुगल प्ले बिलिंग प्रणाली (गुगल प्ले बिलिंग सिस्टिम): ही प्रणाली गुगल प्लेशी संबंधित असून यामुळे जगभरातील कोट्यवधी ग्राहकांशी सोपे व्यवहार शक्य होतात आणि वापरकर्त्यांना पैसे भरण्याचा एक सुरक्षित मार्ग मिळतो.
भारतातील पर्यायी बिलिंग प्रणालीः भारतातील वापरकर्त्यांसाठी एक पर्यायी बिलिंग सिस्टिम सादर केली जाते. यामध्ये वापरकर्त्यांना अॅप वापरताना अतिरिक्त 4% सूट मिळेल.
हेही पहा –