जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टर मध्ये गुरुवारी(२६ऑक्टोबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चांगलीच चकमक झाली. या चकमकी दरम्यान पाच दहशतवादी मारले गेले. यामध्ये तीन दहशतवादी लष्कराशी संबंधित होते तर दोघांची ओळख पटलेली नाही. (Jammu & Kashmir)
पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार एडीजीपी काश्मीर यांनी सांगितले की माछिल सेक्टर मध्ये दहशतवादी भारतीय सीमेमध्ये दहशतवादी भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सुरक्षा दलांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला.
गेल्या पाच दिवसात काश्मीरमध्ये घुसखोरीची ही दुसरी घटना असून ती सुरक्षा दलांनी उधळून लावली. यापूर्वी २२ ऑक्टोबर रोजी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दोन्ही दहशतवादी एका मोठ्या गटाचा भाग होते. जे सतत पाऊस आणि खराब हवामानाचा फायदा घेत नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. (Jammu & Kashmir)
(हेही वाचा : Qatar Court : कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी)
लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सशस्त्र दहशतवाद्यांचा एक गट सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती.यानंतर सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आणि घुसखोरी विरोधी ग्रिड मजबूत करण्यात आली. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांच्या गटाला लष्कराच्या तुकडीने रोखले त्यांनतर दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार सुरु केला. दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लष्कराने शनिवारी रात्री पासून रविवार सायंकाळपर्यंत परिसरात शोध मोहीम राबवली होती.
हेही पहा –