Indian Army Recruitment 2023: भारतीय लष्करात नोकरीची संधी; ‘असा’ करा अर्ज

156

भारतीय लष्कारत काम करण्याची इच्छा असणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्करातील 191 पदांसाठी भरती आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी उमेदवार 09 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात.

भारतीय लष्कराने जारी केलेल्या भरती मोहिमेद्वारे, भारतीय सैन्यात अभियांत्रिकी पदवीधरांच्या 191 पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/काॅम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि इतर विहित पात्रता असणे आवश्यक आहे.

( हेही वाचा: मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टने प्रवास करणा-यांसाठी मोठी बातमी! )

वयोमर्यादा

अधिसुचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि पदानुसार कमाल वय 27/35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

कशी होणार निवड?

भारतीय लष्कराने जारी केलेल्या भरती प्रक्रियेतील पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी शाॅर्टलिस्टिंग प्रक्रिया/ SSB मुलाखत / वैद्यकीय चाचणी आयोजित केली जाईल. एसएसबी मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

‘असा’ करा अर्ज?

अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. याशिवाय, उमेदवार ऑफलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करु शकतात. याशिवाय, उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.