कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ भारतीय सैन्याने माजी सैनिकांची ‘अॉनर रन’ अर्ध मॅरेथॉन (Half Marathon) रविवारी, १० डिसेंबरला दिल्लीत आयोजित केली होती. या संकल्पनेअंतर्गत भारतीय सैन्य, निवृत्त सैनिक, सर्वसामान्य जनता आणि विशेषत: तरुण यांच्यातील बंध अधिकाधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लष्करी सैनिक, निवृत्त सैनिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली.
(हेही वाचा – Corona Patient: थंडीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य मंत्रालयाकडून सावधानतेचा इशारा)
चार श्रेणींमध्ये ऑनर रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 21.01 किमीच्या पहिल्या श्रेणीला ‘कारगिल रन’ असे नाव देण्यात आले. इतर तीन श्रेणींमध्ये 10 किमी धावण्याची ‘टायगर हिल रन’, 5 किमी धावण्याची ‘तोलोलिंग रन’ आणि 3 किमी धावण्याच्या ‘बटालिक रन’ चा समावेश होता. 14,000 हून अधिक सेवारत कर्मचारी, निवृत्त सैनिक, एनसीसी कॅडेट्स, लष्करी जवानांचे कुटुंबिय आणि विविध वयोगटातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी विविध श्रेणीतील विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित केले. कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या विजयाची माहिती देणार्या भारतीय लष्करातील निवृत्त सैनिकांच्या विभागातर्फे एका प्रदर्शनाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते. या दरम्यान स्पर्धकांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन या विजयाच्या उत्सवात त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community