भारताची बॅडमिंटनपटू तान्याने इराणमध्ये जिंकले गोल्ड मेडल, पण हिजाब घातल्यावरच दिले पदक

129

इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. गेल्या ५ महिन्यांपासून महिला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, इराणमध्ये खेळल्या गेलेल्या फजर इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू तान्या हेमंतला हिजाब घालण्यास भाग पाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. तान्याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र हिजाब परिधान केल्यानंतरच तिला हे पदक देण्यात आले.

ड्रेसकोडमध्ये हिजाबचा उल्लेख नव्हता 

कर्नाटकची रहिवासी तान्या हेमंतने फजर इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेती तस्नीम मीरचा पराभव केला. या विजयासह तिने महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले. मात्र सुवर्णपदक जिंकल्यानंतर आयोजकांनी तिला हिजाब घालण्यास सांगितले. त्यानंतरच ती पदक घेण्यासाठी व्यासपीठावर जाऊ शकली. तान्या हेमंतने हा सामना २१-११, २१-७ अशा सरळ सेटमध्ये जिंकला. आयोजकांनी स्पष्टपणे सांगितले होते की, पदक जिंकणाऱ्या महिलांनी हिजाब परिधान करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या नियमांमध्ये ड्रेस कोडचा उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे या स्पर्धेत महिला खेळाडूंना त्यांच्या सामन्यांदरम्यान हिजाब घालण्यावर कोणतेही बंधन नव्हते. मात्र सामन्यादरम्यान कोणत्याही पुरुषाला स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. म्हणजेच महिलांना खेळताना कोणताही पुरुष पाहू शकत नव्हता.

(हेही वाचा तुर्कीतील भूकंपाबाबत ३ दिवसांपूर्वीच मिळालेले पूर्वसंकेत; ट्विट होतेय व्हायरल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.