देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी संसदेत मांडणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांसाठी फायदेशीर असणार अशी शक्यता आहे. कारण नोकरदार वर्गाला त्यांच्या वार्षिक उत्पन्नात कर सवलतींसाठीचा जो स्लॅब आहे तो अडीच लाखांपासून ते ५ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मध्यम वर्गीय नोकरदार वर्ग कायम वाढीव पगाराची अपेक्षा करत असतो, पगाराचा आकडा वाढला की सुखावत असतो. त्याच वेळी मात्र त्याच्या वार्षिक उत्पन्नातील अविभाज्य भाग बनतो तो आयकर. वाढीव वार्षिक उत्पन्नावर त्याला कर भरावा लागतो. आजपर्यंत अडीच लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या नोकरदार वर्गाला कर सवलत मिळत होती. मात्र ही मर्यादा ५ लाखापर्यंत वाढवण्याची मागणी होत होती. केंद्राने जर याला हिरवा कंदिल दाखवल्यास नोकरदार वर्गाच्या हातात येणारा पगार जास्त असेल. यातून गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांची अशीही बनवाबनवी)
सुपर सिनीयर सिटीझनसाठी ५ लाखांची सूट
सध्याच्या घडीला अडीच लाख रुपयांचे मूळ वेतन असणाऱ्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही. तर, ६० ते ८० वर्षे या वयोगटात येणाऱ्यांसाठी कराची मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत आहे. ८० हून अधिक वय असणाऱ्यांसाठी हीच मर्यादा ५ लाख रुपये इतकी आहे.