वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असताना सर्वसामान्य नगरिकांसह प्रत्येक घटकाला वायू प्रदूषण टाळण्यासाठी काम करता यावे म्हणून ‘इंडियन क्लीन एयर कनेक्ट प्लॅटफॉर्म’ने विशेष उपक्रम सुरू केला आहे. वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांवर राष्ट्रीय स्तरावर उपाय योजना करणे हा यामागचा हेतू असून वतावरणाशी निगडीत सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. (Air Pollution)
भारतात वर्षभरात होणाऱ्या मृत्यूपैकी जवळपास एक तृतीयांश मृत्यूंना वायु प्रदूषण कारणीभूत असून जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांपैकी जवळपास ७० टक्के शहरे भारतात आहेत. तसेच बहुतांश शहरे जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा गुणवत्ता मानकांची पूर्तता करीत नसल्याने मोठ्या लोकसंख्येला वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांचा धोका आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत सावध होत वायू प्रदूषणावर प्रगत अशी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. परिणामी याचा फायदा संस्था, संशोधक अभ्यासक आणि नागरिकांना होणार आहे. (Air Pollution)एअर क्वालिटी ईकोसिस्टमचे मॅपिंग, ज्ञान माहिती संशोधन दालन उपलब्ध करणे ही उद्दिष्टे आहेत.
कोणाला होणार लाभ
उपाय ,स्त्रोत आणि महिती शोधणाऱ्यांना हवा गुणवत्ता क्षेत्र शोधण्यात स्वारस्य असलेल्यांना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या मात्र आव्हानांचा सामना करणाऱ्या संस्थांना याचा लाभ होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community