कोरोना काळात देशभरात शेकडो लोकांच्या नोक-या गेल्या. देशातील बेरोजगार लोकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. एप्रिल ते जूनपर्यंत देशातील 38 टक्के कंपन्यांनी अनेक कर्मचा-यांना नव्याने कामावर घेण्याची योजना तयार केली आहे, असे एम्प्लाॅयमेंट आउटलूकच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यामुळे आता देशातील बेरोजगारांना मोठी संधी मिळणार आहे.
महिलांचे प्रतिनिधीत्व कमी
एप्रिल- जून तिमाहित, 55 टक्के कर्मचा-यांना पगार वाढण्याची अपेक्षा आहे. तर 17 टक्के कर्मचा-यांना पगार कमी होईल असे वाटले. तर 38 टक्के लोकांनी पगारात कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कर्मचा-यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कमी असणे, हा अजूनही चिंतेचा विषय आहे. रेस्टाॅरंट्स आणि हाॅटेल्स येथे 38 टक्के तर शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य आणि सरकारी नोकरी येथे 37 टक्के संधी आहेत.
( हेही वाचा: जितेंद्र आव्हाड म्हणाले, …तर मी आत्महत्या करणार! )
वेतन वाढही होणार
आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोक-यांची 51 टक्के संधी आहे. 250 पेक्षा जास्त कर्मचारी काम करणा-या संस्थांमध्ये रोजगाराची संधी 45 टक्के आहे. ज्या संस्थांमध्ये 50-249 कर्मचारी काम करतात तेथे 35 टक्के संधी आहे. या अहवालानुसार, आता येत्या तीन महिन्यांत जगात सर्वच ठिकाणी वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या दोन वर्षांत कंपन्यांनी वेतनवाढ दिलेली नाही.
Join Our WhatsApp Community