कडक नियमावलीत होणार भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा! 

खेळाडूंची विलगीकरण काळात दिवसाआड म्हणजे एकूण सहा वेळा खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रिकेट सामने रद्द करण्यात आले. त्यात आयपीएलचाही समावेश आहे. आयपीएल तर अर्ध्यावरच थांबवावी लागली होती. अजूनही भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. आजही रुग्ण संख्या लाखाच्या घरात आहे. तरीही पुढील महिन्याचा भारतीय संघाचा श्रीलंका दौरा निश्चित झाला आहे. १३ जुलैपासून या ठिकाणी कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

दिवसाआड आरटी-पीसीआर चाचणी करणार! 

मात्र त्याआधी आरोग्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करुन खेळाडूच्या अनेक टेस्टही केल्या जाणार आहेत. श्रीलंका दौऱ्यावर जी खेळाडू जाणार आहेत, त्यांना आधी २ आठवडे मुंबईत विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यानंतर श्रीलंका येथेही तीन दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. भारतीय संघ 13 जुलैपासून श्रीलंका संघासोबत 6 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. नुकतेच इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या संघासाठी करण्यात आली होती तशीच कडक नियमावली श्रीलंका दौऱ्यासाठी तयार करण्यात आली आहे. अन्य राज्यांतून मुंबईत येणाऱ्या खेळाडूंना चार्टर फ्लाइटने आणण्यात येईल. त्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये 14 जून ते 28 जूनपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात येईल. यावेळी दर दिवसाआड म्हणजे सहा वेळा खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.

(हेही वाचा : नाल्यात ग्रील बसवण्याचा महापालिकेला पडला विसर!)

नव्या चेहऱ्यांना संधी

या दौऱ्यासाठी बीसीसीआयने संपूर्ण भरतीय संघाची घोषणा केली. शिखर धवनला कर्णधारपद सोपवण्यात आले असून बीसीसीआयने एकूण 20 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यावेळी संघात काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली असून ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, चेतन सकारिया यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here