भारतीय जातीच्या श्वानांच्या लवकरच (CRPF Dogs) केंद्रीय पोलीस दलांमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. संशयिताचा माग काढणे, अमली पदार्थ तसेच स्फोटकांचा शोध घेणे, धोकादायक क्षेत्रातील पेट्रोलिंग अशा कामांसाठी या श्वानांचा वापर केला जाऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक देशी श्वानांच्या प्रजातींना प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार, ‘हिमालयन माउंटेन कॅनिन’, ‘रामपूर हाउंड’, ‘हिमाचली शेफर्ड’, ‘गड्डी’, ‘बकरवाल’ तसेच ‘तिबेटियन मस्टिफ’ आदी भारतीय जातीच्या श्वानांचा लवकरच केंद्रीय पोलीस दलांमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. सर्व श्वान ‘पोलीस सर्व्हिस के-९ स्क्वाड’चा घटक असतील.
(हेही वाचा – Lalit Patil : ड्रगमाफिया ललित पाटीलची मैत्रिण अॅड. प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड)
‘सीमा सुरक्षा दल’ (Border Security Force), ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ (Central Reserve Police Force), ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’मध्ये (Central Industrial Security Force) अशा विविध दलांमध्ये श्वानांचा समावेश करण्यात येईल. विविध सुरक्षा दलांकडून सध्या कार्यरत असलेल्या श्वानांची कामगिरी तपासली जात आहे. ज्यांची कामगिरी समाधानकारक नसेल त्यांची जागा हे देशी श्वान घेतील. ‘हिमालयन कॅनिन’ जातीच्या श्वानांची चाचणी घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी ‘हिमालयन माउंटेन डॉग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिमाचली शेफर्ड’, ‘गड्डी’, ‘बकरवाल’ आणि ‘तिबेटियन मस्टिफ’ यांच्याही चाचण्या घेतल्या जात आहेत.
हेही पहा –