युक्रेनमधून सुटका होण्यासाठी पाकड्यांनी घेतला तिरंगा! का सुरु झाला #indianstudentsinukraine ट्रेंड?

133

सध्या जगभरातील देश त्यांचे त्यांचे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांना सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. भारतीय विद्यार्थी तेथील युद्धजन्य परिस्थितीतून सुरक्षित बाहेर पाडण्यासाठी भारताचा झेंडा फडकावत चालतात, त्यावेळी त्यांना युक्रेनसह रशियाचे सैनिकही हात लावत नाहीत, म्हणून आता युक्रेनमध्ये अडकलेले पाकिस्तानातील विद्यार्थीही तेथून बाहेर पाडण्यासाठी चक्क भारताचा झेंडा फडकावत तेथून बाहेर पडत आहेत. ट्विटरवर नेटकरी युक्रेनमध्ये अडकलेल्या इतर राज्यांच्या नागरिकांविषयी इत्यंभूत माहिती देत आहेत, त्यामुळे ट्विटरवर #indianstudentsinukraine हा ट्रेंड सुरु आहे.

पाकिस्तानी राजदूत पळाले

याविषयी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना एक नेटकरी म्हणाला की, युक्रेनमधून पाकिस्तानच्या राजदूतांनी पलायन केले आहे, त्यामुळे आता तेथील युक्रेनमधील पाकिस्तानचे विद्यार्थी हे सैरभैर झाले आहेत. त्यांना पाकिस्तानच्या सरकारने तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर पोलंडच्या सीमेपर्यंत पोहचावे, त्यासाठी गाडीवर भारताचा झेंडा लावा, असे म्हटले आहे. त्यानुसार आता हे विद्यार्थी भारताचा झेंडा घेऊन युक्रेनमधून बाहेर पडत आहेत, असे त्या नेटकऱ्याने सांगितले आहे.

काही नेटकऱ्यांनी भारतीय विद्यार्थी कशा प्रकारे सुरक्षित युक्रेनमधून बाहेर सुरक्षितपणे मायदेशी परतत आहेत, याचा तपशील देत आहेत. त्याच वेळी युक्रेनमधून बाहेर पडणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडच्या सीमेवर मारहाण होत आहे, याविषयीदेखील चिंता व्यक्त करत आहेत.

https://twitter.com/mdgazali78692/status/1498233909447835650?s=20&t=Rnji26tSiJIXJgMQOglcuA

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.