स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून उत्तर मुंबईतील बोरीवली (Borivali) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वात मोठा असणारा ७५ फूट उंचावर राष्ट्रध्वज उभारला जात आहे. या राष्ट्रध्वज उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करून लोकापर्ण केले जाणार आहे. जिल्हा विकास निधीतून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. या राष्ट्रध्वज उभारणीसाठी भाजपा उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर हे मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करत होते.
उत्तर मुंबईतील बोरीवली (Borivali) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उत्तर मुंबईतील सर्वात मोठा राष्ट्रध्वज असावा यासाठी भाजपा उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर प्रयत्नशील होते. मागील ७ वर्षांपासून ते यासाठी पाठपुरावा करत होते. त्याला मान्यता मिळाल्यानंतर राष्ट्रध्वज उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात गेला त्यावेळी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षास वर्षास सुरुवात झाली होती आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाच्या निमित्ताने हा ध्वज ७५ फूट उंचावर उभारण्यात येत आहे, असे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी सांगितले.
(हेही वाचा – Drugs : मुंबईत सात महिन्यांत ४७९ कोटींचे अंमली पदार्थ जप्त)
येत्या ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने याचे लोकार्पण होणार आहे. जिल्हा विकास निधीतून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच त्यांनी प्रशासनाला काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले असून या कामात ते जातीने लक्ष घालत आहेत.
राष्ट्रीय उद्यानात होणार, सामूहिक राष्ट्रगान
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उभारण्यात येत असलेल्या या राष्ट्रध्वजामुळे देशप्रेमाची भावना रुजविण्यास मदत होणार आहे. या राष्ट्रध्वजाजळ रोज सकाळी साडेसात वाजता स्थानिक नागरिक, उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांमार्फत सामूहिक राष्ट्रगान होणार आहे. राष्ट्रागानासाठीची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच मुंबईत रोज सामूहिक राष्ट्रगान होणार आहे, अशी माहिती गणेश खणकर यांनी दिली. (Borivali)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community