भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख ९ नोव्हेंबर आहे.
( हेही वाचा : दिवाळीत ‘एसटी’ला पसंती; ५ दिवसांत २ कोटींचे उत्पन्न)
अटी व नियम जाणून घ्या
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – कायमस्वरूपी कॅम्पस येथे स्थित S.No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु. पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर महाराष्ट्र
- मुलाखतीची तारीख – ९ नोव्हेंबर २०२२
- अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in
इतर माहिती
- सहाय्यक प्राध्यापक वेतनश्रेणी – ६५ हजार प्रति महिना ( पीएचडी धारकांसाठी)
- शैक्षणिक पात्रता – आयआयटी, एनआयटी, आयएनआय इत्यागी सीएफटीआयमधून पीएचडी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उच्च पात्रता आणि चांगले शैक्षणितक रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. तसेच अध्यापन/संशोधन/उद्योगात किमान एक वर्ष प्राधान्य
- या भरतीकरता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवारांना संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला अर्ज डाऊनलोड करावा लागेल आणि वॉक-इन मुलाखतीच्या तारखेला सर्व संबंधित कागदपत्रांसह भरलेला फॉर्म सोबत आणावा लागेल.
- दस्तऐवजांच्या पडताळणीच्या वेळी, कागदपत्रे संस्थेच्या निकषांनुसार नसल्यास उमेदवाराला मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.