Indian Job Crisis : भारतात १० पैकी ८ जणांना शोधायची आहे नवीन नोकरी

Indian Job Crisis : एका अहवालातून नोकरीविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

39
Indian Job Crisis : भारतात १० पैकी ८ जणांना शोधायचीय नवीन नोकरी
Indian Job Crisis : भारतात १० पैकी ८ जणांना शोधायचीय नवीन नोकरी
  • ऋजुता लुकतुके

भारतात रोजगार ही तरुणांसमोरची मोठी समस्या आहे, हे तर खरंच आहे. पण, तरुण मिळालेल्या नोकरीतही स्थिर किंवा सुरक्षित नाहीत, असं आता समोर आलं आहे. लिंक्ड-इन या सोशल मीडिया साईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात १० पैकी ८ जणांना काही ना काही कारणांनी नोकरी बदलायची आहे. आणि यातील ५५ टक्के लोकांना २०२५ मध्ये नोकरी बदलणं कठीण वाटतंय. इतकंच नाही तर कंपन्यांनाही कुशल कामगार मिळवण्यात अडचणी येत असल्याचं दिसतंय. (Indian Job Crisis)

(हेही वाचा – ‘मृत्यूच्या तावडीतून थोडक्यात सुटलो’; Sheikh Hasina यांचा फेसबुक पेजवरून ऑडिओ संदेश जारी)

कारण, भारतातील ६९ टक्के एचआर व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे की, कुशल कर्मचारी शोधणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. याचा अर्थ २०२५ मध्ये नोकऱ्या शोधण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. गतवर्षीही नोकरी शोधणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. ३७ टक्के लोक २०२५ मध्ये नोकरी शोधत नाहीत. असे असूनही, ५८ टक्के लोकांना आशा आहे की यावर्षी नोकरीच्या क्षेत्रात सुधारणा होईल आणि त्यांना नवीन नोकरी मिळू शकेल. अनेक लोक एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत आहेत. ४९ टक्के लोक पूर्वीपेक्षा जास्त नोकऱ्यांसाठी अर्ज करत आहेत. मात्र त्यांना कमी उत्तरे मिळत आहेत. तर २७ टक्के एचआर व्यावसायिक दररोज तीन ते पाच तास अर्ज पाहत असतात. तर ५५ टक्के एचआर व्यावसायिकांना योग्य उमेदवाद मिळत नाहीएत. (Indian Job Crisis)

भारतातील ६० टक्के लोक नवीन क्षेत्रात काम करण्यास तयार आहेत. ३९ टक्के या वर्षी नवीन कौशल्ये शिकण्याची तयारी करत आहेत. भविष्यात बहुतांश नोकऱ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हे सर्व कामात समाविष्ट केले जाईल. लिंक्ड – इनने तीन नवीन क्षेत्रांचे वर्णन केले आहे जे सर्वाधिक नोकऱ्या देतात. यामध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर, रोबोटिक्स टेक्निशियन आणि क्लोजिंग मॅनेजर यांचा समावेश आहे (Indian Job Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.