-
ऋजुता लुकतुके
भारतीय लोकांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत चालल्याचं कठोर सत्य एका ताज्या आर्थिक अहवालातून समोर आलं आहे. देशातील १ लाख लोकसंख्येपैकी १८,००० लोक हे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात हे गुणोत्तर जास्त असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हप्त्यांमध्ये वस्तू खरेदी करणं, डेबिट – क्रेडिट कार्डांचा वापर यामुळे लोकांचा वस्तू खरेदीकडे कल वाढला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. (Indian Loan Trap)
(हेही वाचा- Deputy Chief Minister : ‘उपमुख्यमंत्री’पदाची घटनेत तरतूद आहे का ?)
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये कर्जाच्या संदर्भातील माहिती दिली आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, लोकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. शहरी भागांतील लोक इएमआयवर वस्तू खरेदी करतात, असे मानले जाते. मात्र, ग्रामीण भागातील लोक देखील मोठ्या प्रमाणात इएमआयवर वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात कर्जबाजारीपणाचं प्रमाण जास्त असल्याची माहिती अहवालात सांगण्यात आली आहे. (Indian Loan Trap)
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, १ लाख लोकांमागे १८,३२२ जण कर्जबाजारी झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या व्यापक वार्षिक मॉड्यूलर सर्वेक्षणात देण्यात आली आहे. या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार इएमआयवर वस्तू खरेदी करण्यामध्ये शहरी भागातील प्रमाण १७.४४ टक्के आहे. तर ग्रामीण भागातील प्रमाण हे १८.७ टक्के आहे. ग्रामीण भागत कर्ज घेणाऱ्याचं प्रमाण हे ६ टक्क्यांनी वाढलं आहे, तर शहरी भागात हेच प्रमाण २.८ टक्के एवढं आहे. यावरुन ग्रामीण भागात इएमआयवर वस्तू खरेदीचं प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. (Indian Loan Trap)
(हेही वाचा- Border Gavaskar Trophy, Adelaide Test : सलामीला कोण… राहुल की रोहित? शास्त्रीने स्पष्टच सांगितलं)
अहवालात दिलेल्या माहितीनुसार शहरीसह ग्रामीण भागातील कुटुंबाचा मासिक खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या खर्चामुळं देखील कर्जबाजारीपणाचं प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या १० वर्षामध्ये ग्रामीण भागात कुटुंबाचा खर्च १६४ टक्क्यांनी वाढला आहे, तर शहरी भागात कुटुंबाचा खर्च हा १४६ टक्क्यांनी वाढल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. याचं कारण म्हणजे वाढता उत्पादन खर्च आणि घटते उत्पादन हे आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य बाजारभाव नसणे हे देखील कर्जबाजारी होण्याचं कारण आहे. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील महिलांचे कर्ज गेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत शहरी भागातील महिलांचे कर्ज घेण्याचं प्रमाण कमी आहे. १ लाख महिलांमागे ग्रामीण भागत १३ टक्के महिला कर्ज घेतात, तर शहरामध्ये १ लाख महिलांमागे १० टक्केच महिला कर्ज घेतात. या आकडेवारीवरुन ग्रामीण भागात महिलाचं कर्ज घेण्याचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. (Indian Loan Trap)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community