भारतात सध्या दिवाळी धुमधडाक्यात सुरु आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे, दुसरीकडे मात्र चीनची दिवाळखोरी सुरु आहे. चीनमधून परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे चीनची आर्थिक स्थिती खालावली आहे. चिनी शेअर बाजारात पडझड सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूक माघारी परतण्याची शक्यता आहे. चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या अधिवेशनात सहाय्यक धोरणांमध्ये कपात आणि कोविडचे नवे निर्बंध यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढू लागली आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदार चिनी बाजारातून आपला निधी काढून घेण्याचे मन बनवत आहेत.
कोविडच्या धोरणांमध्ये कोणताही बदल न होण्याची चिन्हे
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, सोमवारी विदेशी गुंतवणूकदारांकडून जबरदस्त विक्री झाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसात हाँगकाँगसोबतच्या व्यापार संबंधांद्वारे मेनलँड शेअर्समध्ये १७.९ अब्ज युरो (२.३ अब्ज डॉलर) विक्रमी विक्री झाली आहे. सध्या स्मॉल नेट आऊटफ्लो दिसून येत आहे. जर हा आऊटफ्लो वर्षाच्या शेवटपर्यंत चालू राहिला तर २०१४ मध्ये सुरू झालेला स्टॉक कनेक्ट कार्यक्रमाची ही पहिली वार्षिक घट असेल. चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पाच वर्षांच्या परिषदेनंतर सोमवारी बाजारात मोठ्या विक्रीची नोंद झाली. हँग सेंग चायना एंटरप्रायझेस इंडेक्स २००८ च्या आर्थिक संकटानंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर गेला. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सचे तज्ज्ञ मारविन चेन यांच्या दाव्यानुसार चिनी शेअर्सवर आता परदेशी सेंटीमेंट आता कमी दिसत आहे. कोविडच्या धोरणांमध्ये कोणताही बदल न होण्याची चिन्हे पक्षाच्या अधिवेशनातून समोर आली आहेत.
(हेही वाचा पाकिस्तान्यांचे ट्विट, त्यांना आता काश्मीर नको, विराट पाहिजे!)
Join Our WhatsApp Community