मुंबईच्या समुद्र किनारी भारतीय नौदलाचे कोसळले हेलिकॉप्टर, तिघांना वाचवण्यात यश

137

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ भारतीय नौदलाचे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तिघांना वाचवण्यात यश आले आहे. अद्याप अपघात होण्यामागील कारण समजू शकलेले नाही. मात्र नौदलाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बुधवारी, ८ मार्चला सकाळी ही दुर्घटना घडली. नौदलाचे एक हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. दरम्यान तात्काळ शोध आणि बचाव पथकाने नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

अधिक माहिती अशी की, भारतीय नौदलाच्या स्वदेशी ध्रुव अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरने (एएलएच) बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग केले. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे हेलिकॉप्टर मुंबईपासून नियमित उड्डाणावर होते, तेव्हा ते किनाऱ्याजवळ उतरले. त्यामुळे तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आले. ध्रुव हेलिकॉप्टरमधील तिन्ही क्रू मेंबर्सना नौदलाच्या गस्ती पथकाने वाचवले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – करीरोडमध्ये अपघातग्रस्त दुचाकी स्वारांच्या मदतीला धावून आले ‘आपदा मित्र’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.