पुन्हा महागणार पेट्रोल- डिझेल? ‘हे’ आहे कारण

सध्या जगभरात तेलाच्या किमती उतरल्या असल्या तरी तेल कंपन्यांना मात्र नुकसान होत आहे. इंडियन ऑइलने एप्रिल- जून तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री 10 रुपये 14 रुपये प्रतिलिटरच्या तोट्यात केली. यामुळे दोन वर्षांत पहिल्यांदाच आयओसीने तिमाही तोटा नोंदवला आहे. कंपन्यांना नुकसान होत असल्याने, देशात पेट्रोल- डिझेल पुन्हा एकदा महागण्याची चिन्हे आहेत.

आयओसीला एप्रिल जूनमध्ये दोन वर्षात प्रथमच 1 हजार 992 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 5 हजार 941.37 कोटी रुपयांचा आणि जानेवारी- मार्च तिमाहीत नफा झाला होता. कंपन्यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी इंधनदरात वाढ करणे थांबवले होते. निवडणुका होताच 137 दिवसांनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात एकूण 18 वेळा वाढ करण्यात आली होती.

365 दिवसांत 78 वेळा वाढल्या किमती

गेल्या 364 दिवसांत म्हणजेच एका वर्षांत सरकारने पेट्रोलच्या दरात 78 वेळा वाढ केली असून, केवळ 7 वेळा कमी केली आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात 76 वेळा वाढ करण्यात आली असून, 10 वेळा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

( हेही वाचा: “राऊत गेले, आता परबांची बारी”; रवी राणांचे सूचक वक्तव्य )

प्रतिलिटर 10 रुपयांनी दरवाढ

निवडणुकीनंतर दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी दरवाढ झाली. मात्र, त्यानंतर मे महिन्यात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात आठ रुपयांची तर डिझेलवर सहा रुपयांची कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here