ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या डॉक्टर जयराम यांनी नवजात शिशुच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आणले आहे. काऊंटेस्ट ऑफ मँचेस्टर या रुग्णालयात वर्षात सलग सात नवजात शिशुचा मृत्यू झाला. रुग्णालयात नवजात शिशु विभागात काम करणाऱ्या लेटबी या आरोपी परिचारिकेला रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ जयराम यांनी शोधून काढले. सात नवजात शिशुचे हत्याकांड उघडकीस आणण्यास जयराम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सेकंड उघडकीस आल्यानंतर संपूर्ण उत्तर इंग्लंड हादरून गेले आहे.
2015 साली मंचेस्टर येथे काऊंटेस ऑफ मेंचेस्टर या रुग्णालयात तीन नवजात शिशुचा लागोपाठ मृत्यू झाला. डॉ जयराम यांनी त्यावेळी तीन शिशुच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर 2016 साली पुन्हा नवजात शिशुचे मृत्यू होऊ लागले. त्यावेळी हॉस्पिटल प्रशासनाशी बैठक घेऊन डॉ जयराम यांनी लेटबी नावाच्या परिचारिकेवर संशय व्यक्त केला. दोन वर्षानंतर डॉ जयराम यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेकडून पोलिसांना याबाबत माहिती देण्याची परवानगी दिली. पोलिसांना या प्रकरणी संशय आला. पोलिसांनी सर्व मृत्यूसत्राची चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर लेटबीला अटक करण्यात आली.
(हेही वाचा – Samruddhi Mahamarg : महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरा, नाहीतर तुरुंगात जाल)
2015-16 साली काऊंटेस ऑफ मेंचेस्टर या रुग्णालयात 13 नवजात शिशुचा मृत्यू झाला होता. 13 नवजात शिशुना शिशु विभागात लेटबीने गुप्तपणे मारले. ब्रिटन क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसने याबाबतचा पुरावा न्यायालयात सादर केला. शिशुच्या रक्तप्रवाहात हवेचा दाब टाकणे, दूध जास्त पाजणे जेणेकरून त्यांना श्वासनास अडथळा निर्माण होईल अशा अमानवी पद्धती लेटबीने वापरल्या.
लेटबीवर संशय बळकावण्याचे कारण
लेटबी नवजात शिशु वोर्डात काम करत होती. तिच्या शिफ्टच्या वेळेस सात मृत्यू झाले. सुरुवातीला कोणालाच तिच्यावर संशय आला नाही. जयराम यांनी तिच्या कामाच्या वेळा सात बाळांच्या मृत्यूची वेळ साम्य ओळखले. 2015 साली 3 2016 साली चार नवजात शिशूंचा मृत्यू झाला. पोलिसांचा चौकशीत लेटबीने आपला गुन्हा कबूल केला. तिच्या या अमानवी कृत्यामागील कारण पोलिसांनी अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे .
हेही पहा –
Join Our WhatsApp Community