भीषण: वांद्रे- जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे आठ डब्बे रुळावरून घसरले

आठवड्याच्या सुरुवातीलाच हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थान येथील पाली भागात बांद्रा- जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीचे आठ डब्बे सोमवारी पहाटे रुळावरुन घसरले. पहाटे साधारण 3:27 वाजता हा अपघात झाला, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. CPRO ने सांगितले की, उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर उच्च अधिकारी रेल्वेच्या जयपूर मुख्यालयात या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचतील. यासोबतच रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

जोधपूर

  • 0291- 2654979 (1072)
  • 0291- 2654993 ( 1072)
  • 0291- 2624125
  • 0291-2431646

पाली- मारवाड

  • 0293- 2250324

( हेही वाचा: नवीन वर्षात आरोग्य व्यवस्थेला अजून बळकटी देण्याची गरज )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here